IPL 2021 चं वेळापत्रक ठरलं? 'असं' असू शकतं संपूर्ण शेड्यूल, जाणून घ्या...

आयपीएलचा यंदाचा हा १४ वा सीझन असणार आहे. कोविडमुळे ठराविक स्टेडियमवरच स्पर्धा खेळविण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 03:26 PM2021-01-31T15:26:20+5:302021-01-31T15:39:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 to commence from 11th April and finals likely to happen on 5th or 6th June | IPL 2021 चं वेळापत्रक ठरलं? 'असं' असू शकतं संपूर्ण शेड्यूल, जाणून घ्या...

IPL 2021 चं वेळापत्रक ठरलं? 'असं' असू शकतं संपूर्ण शेड्यूल, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतात कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच आयपीएलचे आयोजन आता भारतातचं होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचा यासाठीचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतची घोषणा केली जाऊ शकते. 

लॉकडाऊननंतर भारतात पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन केल्यानंतर आता आयपीएल २०२१ स्पर्धा देखील भारतातच खेळवावी, असा बीसीसीआयचा विचार आहे. 

... अन् विराट कोहलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ते ट्विट केलं रिट्वीट

आयपीएलचा यंदाचा हा १४ वा सीझन असणार आहे. कोविडमुळे ठराविक स्टेडियमवरच स्पर्धा खेळविण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. यात मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन, डीवाय पाटील, रिलायन्स क्रिकेक स्टेडियम नवी मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे येथे आयपीएलची स्पर्धा खेळविण्यात येऊ शकते. 

MS Dhoniनं बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजानं दाखवला 'स्पार्क'; चोपल्या ३५० धावा अन् खेचले १७ षटकार!

गुजरातच्या अहमदाबाद येथे उभारण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियमचाही यात समावेश होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा मागील मोसम कोरोनामुळे यूएईमध्ये खेळविण्यात आला होता. 

केव्हा होणार सुरुवात आणि शेवट?
आयपीएल-२०२१ स्पर्धेला एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते. ११ ते १४ एप्रिल दरम्यान स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. ६ जूनपर्यंत स्पर्धेचा अंतिम सामना होईल, असं म्हटलं जात आहे. 

कोविडमुळे सुरक्षित वातावरणात आयपीएल स्पर्धा भारतात खेळविण्याची बीसीसीआयची तयारी नसताना वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा बीसीसीआयकडून केला जातोय, अशी टीका होत असल्यामुळे बीसीसीआयनंही आयपीएल स्पर्धा यशस्वीरित्या भारतात पार पाडण्यासाठी कंबर कसली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतातही खेळाडूंसाठी बायो-बबलचं नियोजन यशस्वीरित्या होऊ शकतं, असा दावा बीसीसीआयनं केला आहे. 
 

Web Title: IPL 2021 to commence from 11th April and finals likely to happen on 5th or 6th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.