Join us

IPL 2021 : ख्रिस गेलचं 'जमैका टू इंडिया' गाणं रिलीज; युनिव्हर्स बॉसचा 'हा' अवतार नसेल कधी पाहिला, Video

पंजाब किंग्सचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) मैदानावर युनिव्हर्स बॉस गेलच्या चौकार-षटकाराची सर्वांना उत्सुकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 08:50 IST

Open in App

पंजाब किंग्सचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) मैदानावर युनिव्हर्स बॉस गेलच्या चौकार-षटकाराची सर्वांना उत्सुकता आहे. पण, पंजाब किंग्सच्या पहिल्या सामन्यापूर्वी गेलचं 'जमैका टू इंडिया' हे गाणं रिलीज झालं आहे. रॅपर एमिव्हे बंटाय ( Emiway Bantai) याच्यासोबत गेलनं हे गाणं गायलं आहे आणि हे गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्यात गेल नाचताना दिसत आहे.  

हे गाणं इंग्लिशमध्ये गेलनं, तर हिंदीत एमिव्हेनं गायलं आहे. याला संगीत टोनी जेम्स यानं दिलं आहे. एमिव्हेनं हे गाणं यूट्यूब चॅनेलवर रिलीज केलं आणि आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिलं आहे.  

पाहा व्हिडीओ...

गेलनं आयपीएलच्या मागील पर्वात २८८ धावा केल्या होत्या . आयपीएलमध्ये सर्वाधिक ३४९ षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. शिवाय ३००+ चौकार व षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१ख्रिस गेलपंजाब किंग्स