ठळक मुद्देसंघाने प्ले ऑफमधील प्रवेश केला असल्याने आता नक्कीच खेळाडूंच्या कार्यभारावर लक्ष देऊन त्याबाबत काही नियोजन करण्यात येईल, फ्लेमिंग याचं वक्तव्य.
शारजा : ‘आमच्या संघाने प्ले ऑफमधील प्रवेश केला असल्याने आता नक्कीच खेळाडूंच्या कार्यभारावर लक्ष देऊन त्याबाबत काही नियोजन करण्यात येईल. पण, हे करीत असताना संघ व्यवस्थापनाकडून फार प्रयोगही होणार नाहीत,’ असे चेन्नई सुपरकिंग्जचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने सांगितले. चेन्नईने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला सहा गड्यांनी नमवीत बाद फेरीत प्रवेश केला.
‘मी लयबाबत चर्चा करीत नाही. काही खेळाडूंच्या कार्यभाराबाबत आम्हाला नियोजन करावे लागेल. आम्हाला एक दिवसाने अबुधाबीला जायचे असून, त्यानंतर पुन्हा विश्रांती आणि आणखी एक सामना आहे. त्यामुळे आम्ही अशा परिस्थितीत बाकावर बसलेल्या काही खेळाडूंना संधी देऊ शकतो, पण हे करीत असताना फार प्रयोगही करणार नाही.’
गेल्या सत्रात चेन्नईला बाद फेरी गाठण्यात यश आले नव्हते. फ्लेमिंग पुढे म्हणाला की, ‘आम्ही सलग चार सामने जिंकलो. पहिल्या सत्रात आमच्याकडून चुका झाल्या.