Join us  

IPL 2021 : न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या खेळाडूंचाही पाकिस्तानला ठेंगा; IPL फ्रँचायझींसोबत खेळण्यास प्राधान्य!

IPL 2021: भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 4:15 PM

Open in App

IPL 2021: भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईत आयपीएलचे उर्वरित ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे भारतात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही यूएईतच होणार आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून आयपीएलमध्ये खेळणे योग्य समजत आहेत. त्यामुळेच न्यूझीलंड संघानेही पाकिस्तान दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून प्रमुख खेळाडूंना वगळले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जळफळाट झाला आहे. त्यात इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंनीही पाकिस्तान दौरा करण्यापेक्षा आयपीएलला महत्त्व दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ( BCCI officially confirms English and Australian players will be available for Phase 2 in UAE ) 

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा ताफा पोहोचला दुबईत; मालक अंबानी यांनी खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल, See Photo

यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उपलब्ध असतील अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ इयॉन मॉर्गन, डेव्हिड वॉर्नर हे आयपीएलच्या दुसऱ्या पर्वासाठी उपलब्ध असणार आहेत.  आयपीएलचे COO हेमांग आमीन यांनी सर्व आठ फ्रँचायझींना माहिती दिली की, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलसाठी यूएईत जाण्यास संबंधित बोर्डांनी परवानगी दिली आहे. पण, अंतिम निर्णय हा खेळाडूंवर सोडला आहे.  

IPL 2021 : अखेर सुरेश रैनाला 'बालकनी'वाली खोली मिळाली, सोशल मीडियावर MS Dhoni सोबतच्या वादाची चर्चा सुरू झाली!

Cricbuzzशी बोलताना पंजाब किंग्सचे CEO सतिश मेनन यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडच्या खेळाडूंना संबंधित क्रिकेट बोर्डांनी आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिल्याची माहिती आम्हाला बीसीसीआयनं दिली. पण, त्यांनी अंतिम निर्णय हा खेळाडूंवर सोपवला आहे.

पंजाब किंग्समधील ऑस्ट्रेलियन व इंग्लंडचे खेळाडू - रिली मेरेडिथ, मोईजेस हेन्रीक्स, झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन, डेव्हीड मलान  

चेन्नई सुपर किंग्संचे CEO कासी विश्वनाथ यांनीही हीच माहिती दिली. त्यामुळे जेसन बेहरेनडॉर्फ, सॅम कुरन  व मोईन अली हे CSKसाठी उपलब्ध असतील. सनरायझर्स हैदराबादनेही कर्णधार डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार असल्याचे आधीच सांगितले आहे. तसेच जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो हेही खेळणार असल्यानं SRHची ताकद आणखी वाढली आहे.  इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या माहितीनंतर आयपीएलमध्ये खेळणारे इंग्लंडचे खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमीच आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१इंग्लंडआॅस्ट्रेलियान्यूझीलंडपाकिस्तान
Open in App