Join us

IPL 2021 : विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं केले दिल्ली कॅपिटल्सला ट्रोल

गुरूवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. यासामन्यातील विजयानंतर राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून  दिल्लीला ट्रोल केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:44 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कगुरूवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनेदिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. यासामन्यातील विजयानंतर राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून  दिल्लीला ट्रोल केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोळव्या षटकांत जेव्हा राजस्थानचा संघ १०४ धावांवर सात बाद अशा परिस्थितीत होता. तेव्हा ही काय मॅच आहे. असे ट्विट केले होते.

मात्र त्यानंतर ख्रिस मॉरीसच्या खेळीने दिल्लीचा विजयाचा घास काढुन घेतला. मॉरीसच्या तुफानी खेळीने राजस्थानने विजय मिळ‌वला. त्यानंतर राजस्थानने दिल्लीच्या त्या ट्विटला टॅग करत मॉरीसची एक तीन सेकंदांची क्लिप पोस्ट केली आणि त्यावर फक्त ‘हॅलोजी’ असे लिहले आहेत.

मॉरीसने आपल्या शानदार खेळीने दिल्ली कॅपिटल्सचा विजय हिरावून घेतला. त्यामुळे सर्वचजण त्याच्या खेळीचे कौतुक करत आहेत. या सामन्यात दिल्लीचे पारडे जड असताना दिल्लीच्या संघाने आपल्या ट्विटर हँडलवरून राजस्थानची चांगलीच खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला सामना विजयानंतर रॉयल्सने चांगलेच प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स