Join us

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीबद्दल समालोचक आकाश चोप्राचे वादग्रस्त विधान; नेटिझन्सनी घेतला समाचार

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 17:31 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्सनं ४५ धावांनी हा सामना जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.  CSKच्या ९ बाद १८८ धावांचा पाठलाग करताना RRचा संघ ९ बाद १४३ धावा करू शकला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला सहा षटकं खेळण्यासाठी मिळाली होती, परंतु त्याला पुन्हा एकदा अपयश आलं. त्यानं काही चपळ धावा घेताना तंदुरुस्ती दाखवली, परंतु बॅट आणि चेंडू यांचा ताळमेळ राखताना तो चाचपडताना पाहायला मिळाला. धोनी बाद झाल्यानंतर समालोचक आकाश चोप्रा यानं वादग्रस्त विधान केलं. त्यावरून नेटिझन्सनी त्याला झोडपलं. विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video

प्रथम फलंदाजी करताना फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) , मोईन अली ( २६) , अंबाती रायुडू ( २७) व सुरेश रैना ( १८) यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावा केल्या. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video

धोनीला युवा गोलंदाज चेतन सकारियानं बाद केलं. त्यानंतर आकाश चोप्रा म्हणाला, चाहते ज्याला देव मानतात त्याच्यात चूका काढत नाहीत. गोष्ट थोडी कटू आहेस, परंतु ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सावली थोडी लांब होत जाते.''  'ही कसली खिलाडूवृत्ती?'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संपात, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स