चेन्नई: आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सर्व हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) संघ बाद फेरीत पोहोचला आहे. चेन्नईचा संघ आतापर्यंत दहावेळा आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. या दहाही वर्षी चेन्नईनं बाद फेरी गाठली. तर तब्बल आठ वेळा संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. यातल्या तीन वेळा संघानं जेतेपद पटकावलं. मात्र यंदा पहिल्यांदाच चेन्नईच्या संघाला बाद फेरी गाठण्यात अपयश आलं आहे.
महेंद्रसिंग धोनी IPLमधूनही निवृत्त होतोय? CSKच्या कर्णधाराच्या 'त्या' कृतीनं सुरू झालीय कुजबूज
बारा सामन्यांत चार विजय मिळवणारा चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत तळाला आहे. चेन्नईचे दोन सामने शिल्लक आहेत. मात्र सध्याचं गणित पाहता चेन्नईच्या संघ बाद फेरी अत्यंत कठीण आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम चेन्नईसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. लौकिकाला साजेशी खेळी करण्यात अपयश आल्यानं कर्णधार महेंद्रसिंह धोनीला टीकेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी संघाच्या आणि धोनीच्या भवितव्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं.
'अखेरचे वेदनादायक १२ तास उरलेत; पण आम्ही आनंद घेऊ'; ‘कॅप्टन कूल’ने मान्य केला पराभव
२०२१ च्या मोसमातही महेंद्रसिंह धोनीच चेन्नईच्या संघाचं नेतृत्त्व करेल, असा विश्वास विश्वनाथन यांनी व्यक्त केला. 'धोनीच्या नेतृत्त्वाखाली संघानं तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आम्ही आतापर्यंत १० वेळा आयपीएल खेळलो आहे. या सगळ्या मोसमांमध्ये आम्ही बाद फेरी गाठली. इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी जमलेली नाही. यंदा पहिल्यांदाच आम्हाला बाद फेरी गाठण्यात अपयश आलं. पण एक वर्ष खराब गेलं याचा अर्थ आम्ही सगळं काही बदलावं असा होत नाही,' असं विश्वनाथन टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
चेन्नई सुपर किंग्सचे IPL 2020मधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर साक्षी धोनीची भावनिक पोस्ट
विश्वनाथन यांनी संघाच्या क्षमतेवर आणि यंदाच्या कामगिरीवर अतिशय स्पष्टपणे भाष्य केलं. 'यंदा आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. जे सामने आम्ही जिंकायला हवे होते, ते सामने आम्ही हरलो. त्यामुळेच आम्ही पिछाडीवर गेलो. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीचा आणि काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचा फटका संघाला बसला,' असं विश्वनाथन यांनी सांगितलं.