Join us  

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी 'गब्बर' अन् शेन वॉटसन ‘diesel engine’; वीरेंद्र सेहवागचा Video व्हायरल

रविवारी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यानंतर सेहवागनं असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात वीरू गोविंदा स्टाईलमध्ये दिसला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 05, 2020 6:39 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांचे मनोरंजन केलेच, त्यानंतर समालोचन आणि सोशल मीडियावरील पोस्टनेही लोकांना इंटरटेन करत आहे. Indian Premier League ( IPL 2020) 13 व्या पर्वात तो नवनवीन व्हिडीओ घेऊन येत आहे आणि IPLच्या सामन्यांचे विश्लेषण करताना पाहायला मिळत आहे. पण, त्यात त्याची शैली पाहून सर्वांना आनंद मिळत आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यानंतर सेहवागनं असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात वीरू गोविंदा स्टाईलमध्ये दिसला. त्यानं महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) ला गब्बर, तर शेन वॉटसनला ( Shane Watson) ‘diesel engine’ असे संबोधले.

फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघाला रविवारी चेन्नई  सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) सहज पराभूत केले. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना संघाला दहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला. KXIPचे 179 धावांचे लक्ष्य CSKनं एकही विकेट न गमावता पार केले. 2013नंतर CSKनं पुन्हा एकदा KXIPवर दहा विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयाने CSKची गाडी रुळावर आली.  

प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी दणक्यात सुरुवात  करून दिली. लोकेश राहुल ( ६३), मयांक अग्रवाल ( २६), मनदीप सिंग ( २७) निकोलस पूरन ( ३३) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारली. 

CSKकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. फॉर्माशी झगडत असलेल्या शेन वॉटसननं KXIPच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या जोडीला फॅफ ड्यू प्लेसिस होताच. आतापर्यंत सलामीच्या जोडीचं अपयश CSKची डोकेदुखी ठरत होती, त्याच सलामीवीरांनी विजयाचा मजबूत पाया रचला. या दोघांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. वॉटसन ५३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर फॅफनं ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ८७ धावांवर नाबाद राहीला. चेन्नईनं १७.४ षटकांत बिनबाद १८१ धावा केल्या.  

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :IPL 2020विरेंद्र सेहवागमहेंद्रसिंग धोनीशेन वॉटसनचेन्नई सुपर किंग्सकिंग्स इलेव्हन पंजाब