आवडत्या मैत्रिणीशी बोलायचं असल्यास, चॅटवर संवादाची सुरवात करायची असल्यास मराठी मुलांचा एक ठरलेला प्रश्न असतो. हा प्रश्न प्रचंड फेमस आहे. इतका की अगदी यावर मीम्स तयार होतात. ते व्हायरल होतात. अहो, किती वेळ तो एकच प्रश्न विचारणार? काहीतरी नवीन विचारा की, असं म्हणण्याची वेळ यावी, इतका हा प्रश्न तरुणींना सवयीचा झालाय. मध्यंतरी तुमच्याकडे काय म्हणतोय कोरोना, असा एक प्रश्न येऊन गेला. पण तो काही दिवसांपुरता. त्यानंतर पुन्हा हाच प्रश्न मराठी मुलं विचारू लागली. हा प्रश्न म्हणजे 'जेवलीस का?'
जेवलीस का..? याच प्रश्नामुळे अनेक मुलांचा संवाद सुरू होता. याच प्रश्नामुळे काहींचं जुळतंदेखील. या प्रश्न तसा फारसा टाळता नाही. याशिवाय या प्रश्नात काळजीदेखील आहे. त्यामुळे या प्रश्नामुळे संवादाची गाडी पुढे सरकण्याची शक्यताही जास्त असते. लाखो मराठी तरुण तरुणींना विचारत असलेला हाच प्रश्न आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला विचारला आहे. तोही थेट अगदी मैदानावरून.
ऑसी दौऱ्यासाठी संघात निवड न झालेल्या सूर्यकुमार यादवनं दिली विराट कोहलीला टशन, Video
विराट कोहली आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोघेही बरेच लांब आहेत. विराट मैदानात, तर अनुष्का स्टेडियममध्ये. त्यामुळे दोघांमध्ये खाणाखुणांच्या माध्यमातून संवाद झालाय. मैदानात आपल्या संघासोबत असलेला कोहली अनुष्काला 'जेवलीस का?' विचारतोय. त्यावर अनुष्का हसत हसत थम्स अप करून 'हो' असं उत्तर देतेय. यानंतरही पुढे काही वेळ दोघांमध्ये खाणाखुणांच्या माध्यमातून संवाद सुरू आहे.
अनुष्काचा अपमान करणा-याचा विराट कोहलीने असा केला होता पाणउतारा, 'लेडी लव्ह'साठी आहे तो बराच पझेसिव्हविराट आणि अनुष्का यांचा व्हिडीओ यूएईमधील आहे. चेन्नईविरुद्ध बंगलोर सामन्यात विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अनुष्का याआधीही बंगलोरच्या सामन्यांना उपस्थित राहिली आहे. सध्या अनुष्का गर्भवती आहे. जानेवारीत आम्ही दोनाचे तीन होऊ, अशी घोषणा दोघांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून केली आहे.