RCB vs MI Latest News : That stare game between Suryakumar Yadav and Virat Kohli, Video | RCB vs MI Latest News : ऑसी दौऱ्यासाठी संघात निवड न झालेल्या सूर्यकुमार यादवनं दिली विराट कोहलीला टशन, Video

RCB vs MI Latest News : ऑसी दौऱ्यासाठी संघात निवड न झालेल्या सूर्यकुमार यादवनं दिली विराट कोहलीला टशन, Video

RCB vs MI Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाच्या १६४ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नं तुफान फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवनं चौकार-षटकारांची आतषबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्यानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन न करता RCBचा कर्णधार विराट कोहली याला टशन दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात स्थान न मिळाल्याचा राग सूर्यकुमारनं या सामन्यात काढला.

किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात कोणताही बदल नाही, तर RCBच्या ताफ्यात तीन बदल आहेत. आरोन फिंचच्या जागी सलामीला आलेल्या जोश फिलिफनं युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलसह RCB ला सावध सुरुवात करून दिली. IPL 2020 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिफनं २४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. RCBला ७१ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार विराट कोहलीला ( ९) मोठी खेळी करता आली नाही. एबी डिव्हिलियर्सची ( १५) तोफ आज थंडावली.  शिवम दुबेला ( २) जसप्रीत बुमराहनं त्याला बाद केले. त्याच षटकात बुमराहनं RCBला मोठा धक्का देताना देवदत्तला माघारी पाठवले. देवदत्त ४५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार मारून ७४ धावांवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक करताना RCBला २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.

प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांना मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून देता आली नाही. धावफलकावर ३७ धावा असताना क्विंटन ( १८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. युझवेंद्र चहलनं MIच्या दुसऱ्या सलामीवीराला बाद केले. इशान किशन २५ धावांवर बाद झाला. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या देवदत्तनं क्षेत्ररक्षणातही अफलातून झेल टिपला. सौरभ तिवारीला ( ५) मोहम्मद सिराजनं बाद केलं. सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु चहलनं त्यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. यादवनं २९ चेंडूंत अर्धशतक झळकावून टीम इंडियाच्या निवड समितीला चपराक मारली. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RCB vs MI Latest News : That stare game between Suryakumar Yadav and Virat Kohli, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.