Join us

IPL 2020: ...अन् जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला एकच फलंदाज पडला भारी

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गुरूवारच्या विजयात के.एल. राहुलच्या शतकी खेळीची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 13:32 IST

Open in App

- ललित झांबरे

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गुरूवारच्या विजयात के.एल. राहुलच्या शतकी खेळीची चर्चा आहे. या शतकी खेळीत त्याने बरेच विक्रम केले, जसे की आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाची ही सर्वोच्च खेळी आहे, राहुलचे हे दुसरे आयपीएल शतक आहे आदी, पण एक अनोखा विक्रम जो घडला तो असा की के.एल.राहुलने धावा केल्या 132  आणि  राॕयल चॕलेंजर्सचा संघ बाद झाला 109 धावात. म्हणजे एकट्या राहुलच्या धावा प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त होत्या. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एकटा राहुलच प्रतिस्पर्धी संघाला भारी पडला. 

आयपीएलच्या इतिहासातील अशा प्रकारची ही केवळ सातवी खेळी आहे ज्यात एकाच फलंदाजाने प्रतिस्पर्धी फलंदाजापेक्षा अधिक धावा केल्या. त्यातही टी-20 क्रिकेटचा किंग ख्रिस गेलने दोनवेळा असा पराक्रम केला आहे आणि 2016 मध्ये तर एबीडी विलियर्स व विराट कोहली या दोघांनी एकाच सामन्यात प्रतिस्पर्धी संघापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. 

एक विशेष म्हणजे अशा सहा सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी एक संघ राॕयल चॕलेंजर्स आहे. त्यांच्या पाच फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघापेक्षा अधिक खेळी केली आहे आणि दोन वेळा त्यांच्याविरुध्द अशा खेळी झाल्या आहेत. 

प्रतिस्पर्धी संघाला एकट्यानेच भारी पडलेले हे फलंदाज असे..

1) ब्रेंडन मॕक्क्युलम (158)

केकेआर वि. आरसीबी (82)- 2008

2) राहुल द्रविड (66)

आरसीबी वि. राजस्थान (58)-  2009

3) ख्रिस गेल (175)

आरसीबी वि. पुणे वाॕरियर्स (133)- 2013

4) ख्रिस गेल (117)

आरसीबी वि. किंग्ज इलेव्हन (88)- 2015

5)एबी डी विलियर्स (129)

आरसीबी वि. गुजरात लायन्स (104)- 2016

6) विराट कोहली (109)

आरसीबी वि. गुजरात लायन्स (104)- 2016

7) के.एल.राहुल (132)

किंग्ज इलेव्हन वि. आरसीबी (109)- 2020

टॅग्स :IPL 2020लोकेश राहुलख्रिस गेल