Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2020 : बेटिंग प्रकरणी बंगळुरूतून तिघांना अटक

बंगळुरू येथे आयपीएलच्या सामन्यांवर बेटिंग लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केले.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 27, 2020 20:32 IST

Open in App

बंगळुरू येथे आयपीएलच्या सामन्यांवर बेटिंग लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. 

यापैकी दोघांना मल्लेश्वरम येथून अटक करण्यात आले. ही घोनं राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यावर बेटिंग लावत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १३.५ लाख रुपये जप्त केले. तिसऱ्या व्यक्तीकडून ८५ हजार जप्त करण्यात आले. 

सोमवारी, आयपीएल बेटिंग प्रकरणी गोवा पोलिसांची मोहीम चालूच असून  क्राईम ब्रँच पोलिसांनी हडफडें येथे तीन गुजरातींना बेटिंग घेताना रंगेहाथ पकडून अटक केली. मोबाईल फोन तसेच अन्य साहित्य त्यांच्याकडून जप्त केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आयपीएल मोसमात त्यांनी आतापर्यंत १ कोटी  १७ लाख रुपयांहून अधिक रकमेचे बेटिंग घेतले. यात गुजरातच्या ग्राहकांचा अधिकाधिक समावेश आहे.  

टॅग्स :IPL 2020गुन्हेगारीक्रिकेट सट्टेबाजी