Join us

IPL 2020 SRH vs KXIP: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली, घेतला फलंदाजीचा निर्णय 

किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर आहे. (IPL-2020 sunrisers hyderabad vs kings xi punjab match )

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 8, 2020 19:16 IST

Open in App

दुबई : आयपीएल टि-20 स्पर्धेच्या 13व्या पर्वातील 22वा सामना आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धकिंग्स इलेव्हन पंजाबदरम्यान खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत गोलंदाजांच्या नाकर्तेपणामुळे सुमार कामगिरी करणाऱ्या या दोन्ही संघांची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असणार आहे. SRH vs KXIP Live Updates

किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर आहे.

यावेळी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन भारता ऐवजी यूएईमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात बरोबरीचा सामना होताना दिसत आहे. या स्पर्धेत काही फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. तर काही गोलंदाजांनी अनेक वेळा आपल्या बळावर सामन्याचा रोख आपल्या संघाकडे वळवल्याचेही दिसून आले आहे.

सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य संघ - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर) मनीष पांडे, केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद आणि टी. नटराजन.

किंग्स इलेव्हन पंजाबचा संभाव्य संघ -केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन(विकेटकीपर), मयंक अग्रवाल, मनदीप सिंह,  ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, मुजीब उर रहमान, रवि बिश्नोई, इशान पोरेल, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल.

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादकिंग्स इलेव्हन पंजाब