Join us  

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद खूश!; हुकमी खेळाडूचे केले स्वागत

आयपीएलच्या १३व्या पर्वाला शनिवारपासून सुरुवात होत असून क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यामध्येही सनरायझर्स हैदराबादचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 10:04 AM

Open in App

मुंबई : आयपीएलच्या १३व्या पर्वाला शनिवारपासून सुरुवात होत असून क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यामध्येही सनरायझर्स हैदराबादचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण, त्यांचा हुकमी फलंदाज आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचे यूएईमध्ये आगमन झाले आहे.वॉर्नरने २०१९, २०१७ आणि २०१५ अशी तीन वर्षे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावताना ऑरेंज कॅप पटकावली आहे. हैदराबादच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये वॉर्नर त्यांचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका खेळून वॉर्नर यूएईमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे आयपीएलमध्ये खेळणारे इतर खेळाडूही यूएईमध्ये आले असून, हे सर्व खेळाडू सध्या क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबादने आपल्या कर्णधाराच्या येण्याचा आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला.हैदराबाद संघाने ट्वीटरवर वॉर्नरचा एक्सरसाईज करतानाचा व्हिडिओ पोस्ट करताना ‘वेलकम बॅक वॉर्नर’ असा संदेश लिहिला आहे. क्वारंटाईनमध्ये असल्याने वॉर्नरला आपल्या रुममधून बाहेर पडता येणार नसल्याने त्याने रुमच्या बाल्कनीमध्येच एक्सरसाईजला सुरुवात केली आहे.वॉर्नरच्या फॉर्मचं काय?डेव्हिड वॉर्नर हैदराबादच्या फलंदाजीचा कणा आहे यात वाद नाही. मात्र नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला आपल्या लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये वॉर्नरने केवळ १२ च्या सरासरीने ३६ धावा केल्या. यामध्ये २४ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.टी-२० मालिकेमध्येही त्याला फार काही करता आले नाही. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळताना ११६च्या स्ट्राईक रेटने ५८ धावा केल्या. ५८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. दुसऱ्या सामन्यात वॉर्नर शून्यावर बाद झाला होता.   

 

मजबूत गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २०१६ साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. या संघाची खासियत म्हणजे, या संघाने १३०-१४० धावांपर्यंतची माफक धावसंख्या जरी उभारली, तरी प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्य गाठताना नाकीनऊ येतात. याचे कारण म्हणजे सनरायझर्स हैदराबादची तगडी गोलंदाजी. एकाहून एक सरस गोलंदाजांचा समावेश असलेल्या हैदराबादविरुद्ध खेळताना प्रत्येक संघाच्या प्रमुख फलंदाजांवर मोठी जबाबदारी येते.२०१३ सालापासून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने पदार्पणातच चौथे स्थान मिळवून आपली क्षमता सिद्ध केली. मात्र यानंतर दोन वर्षे त्यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. २०१६ साली जेतेपद पटकावल्यानंतर हैदराबादने सलग तीन वर्षे बाद फेरी गाठली. यामध्ये २०१८ साली त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा हैदराबादने आपल्या ताफ्यात काही आक्रमक फलंदाजांना समाविष्ट केले आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीला केन विलियम्सन, मिशेल मार्श आणि सर्वात महत्त्वाचे जॉनी बेयरस्टॉ यांची साथ असेल. त्याचवेळी, केवळ चार परदेशी खेळाडूंनाच अंतिम संघात खेळविण्याचा नियम असल्याने संघ व्यवस्थापनाची अंतिम संघ निवडताना मोठी कसोटी लागेल.सर्वोत्तम कामगिरी : २०१६ साली विजेतेपद फलंदाजी : कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने संघाकडे आक्रमक सलामीवीर असून त्याच्या जोडीला इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टॉ येऊ शकतो. या दोघांनी वेगवान सुरुवात करुन दिल्यास हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात सोपे जाईल. केन विलियम्सन, रिद्धिमान साहा, मिशेल मार्श, मनिष पांड्ये यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. 

टॅग्स :आयपीएल 2020सनरायझर्स हैदराबादडेव्हिड वॉर्नर