Join us  

IPL 2020 : सनरायजर्सचा कर्णधार गेल्या सहा सत्रात ठरला अव्वल परदेशी फलंदाज

सनरायजर्स हौदराबादच्या संघाचा कर्णधार गेल्या सहा सत्रांपासून इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 3:43 PM

Open in App

सनरायजर्स हौदराबादच्या संघाचा कर्णधार गेल्या सहा सत्रांपासून इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरत आहे. २०१५ पासून सनरायजर्स हौदराबादचा कर्णधार असलेल्या डेव्हिड वॉर्नर याने परदेशी  खेळाडूंमध्ये आपली हुकुमत फलंदाजीवर कायम ठेवलीआहे. त्याने २०१८ चे सत्र वगळता प्रत्येक सत्रात शानदार कामगिरी केली आहे. तो परदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त धावा  जमवणारा खेळाडू ठरला आहे.

बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी ठरलेल्या वॉर्नरला २०१८  च्या सत्राला मुकावे लागले होते. मात्र त्या वेळी देखील सनरायजर्सचा कर्णधार असलेल्या केन विल्यमसन हाच आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा परदेशी खेळाडू ठरला होता.  २०१८ च्या सत्रात विल्यमसन याने ७३५ धावा केल्या होत्या. २०१६ चे सत्र हे वॉर्नरसाठी सर्वात शानदार राहिले आहे. त्याने त्या सत्रात ८४८ धावा करत संघाला विजेतेपद देखील पटकावून दिले होते. 

आयपीएलच्या सत्रात सर्वात जास्त धावा जमवणारे परदेशी खेळाडू२०२० डेव्हिड वॉर्नर ५४८२०१९ डेव्हिड वॉर्नर ६९२२०१८ केन विल्यमसन ७३५२०१७ डेव्हिड वॉर्नर ६४१२०१६ डेव्हिड वॉर्नर ८४८२०१५ डेव्हिड वॉर्नर ५६२ 

टॅग्स :IPL 2020डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबाद