Join us  

IPL 2020 : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू सनरायझर्स हैदराबादला करणार मार्गदर्शन

इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाने सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 6:31 PM

Open in App

हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाने ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीनची सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड केली आहे. यापूर्वी संघाने इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बायलिस यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. सिमॉन हेल्मोट यांच्या जागी आता हॅडीन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. मार्च 2013मध्ये हेल्मोट यांची नियुक्ती करण्यात आली होती.

बायलिस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. हॅ़डीनने यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत काम केले आहे. बायलिस हेही 2012 ते 2015 या कालावधीत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने 2012 आणि 2014मध्ये जेतेपद पटकावले. हॅडीनला 2011मध्ये कोलकाताने आपल्या चमूत दाखल करून घेतले होते. हॅडीन बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर संघाचा कर्णधार असताना बायलिस हे प्रशिक्षक होते. या जोडीनं 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन संघासोबत काम करण्याचा अनुभवही हॅडीनकडे आहे. हैदराबाद संघाला मागील मोसमात साजेशी कामगिरी करता आली नाही.  

टॅग्स :आयपीएलसनरायझर्स हैदराबादआॅस्ट्रेलिया