IPL 2020, SRH vs CSK: सनरायजर्सविरुद्ध चेन्नई विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

धोनीच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या लढतीत ७ धावांनी पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास प्रयत्नशील असेल. सनरायजर्स संघाची स्थितीही फारशी चांगली नाही. त्यांनी सातपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:52 IST2020-10-13T03:27:25+5:302020-10-13T06:52:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020, SRH vs CHK: Chennai look forward to winning against Sunrisers | IPL 2020, SRH vs CSK: सनरायजर्सविरुद्ध चेन्नई विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

IPL 2020, SRH vs CSK: सनरायजर्सविरुद्ध चेन्नई विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

दुबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्स संघाला जर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपल्या आशा कायम राखायच्या असतील तर त्यांना मंगळवारी येथे सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत दमदार पुनरागमन करावे लागेल. तीन वेळचा चॅम्पियन व गेल्यावेळी उपविजेता असलेल्या चेन्नई संघाला यावेळी सातपैकी पाच सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. या लढतीत धोनीच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या लढतीत ७ धावांनी पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास प्रयत्नशील असेल. सनरायजर्स संघाची स्थितीही फारशी चांगली नाही. त्यांनी सातपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवला आहे.

वेदर रिपोर्ट । ३७ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी २९ टक्के तर हवेचा वेग २६ किमी. प्रति तास राहण्याची शक्यता.

पीच रिपोर्ट । प्रथम फलंदाजी करणाºया संघाला लाभ मिळतो, पण गेल्या सामन्यात राजस्थानने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळविला.

मजबूत बाजू
चेन्नई । शेन वॉटसन व फाफ ड्यूप्लेसिस यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये दीपक चाहर व जडेजा प्रभावी ठरले. हैदराबाद। बेयरस्टो, वॉनर, मनीष पांडे, केन विलियम्सन सातत्याने चांगल्या धावा करीत आहेत.

कमजोर बाजू
चेन्नई। लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी. मधली फळी आऊट आॅफ फॉर्म.
हैदराबाद। पराभवामुळे मनोधैर्यावर परिणाम झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत गोलंदाजी कमकुवत. संदीप शर्मा, खलील अहमद व युवा अभिषेक शर्मा गोलंदाजीमध्ये अपयशी.

Web Title: IPL 2020, SRH vs CHK: Chennai look forward to winning against Sunrisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.