Join us  

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

आयपीएल होणार हे निश्चित होताच न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 12:19 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) आता फक्त केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. आयपीएल होत असल्याचे निश्चित झाल्याने सर्वांना आनंद झाला आहे, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा कर्णधार विराट कोहलीसह महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचं टेंशन वाढवणारे वृत्त समोर आले आहे. 

केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल! 

140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

आयपीएल होणार हे निश्चित होताच न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पण, आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश अनिश्चित आहे. आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणे अशक्य आहे. त्यात एबी डिव्हिलियर्स ( RCB), क्विंटन डी'कॉक ( MI) यांचा समावेश आहे.   (South African cricketers doubtful for IPL 2020)

कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत कठोर लॉकडाऊन आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद आहे. आफ्रिकन देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान वाहतूक कधी सुरू होईल याची कल्पना नाही.  १८ ऑगस्टपासून कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरू होत आहे. त्यातही आफ्रिकेच्या खेळाडूंच्या समावेशाबाबत साशंकता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सीमाही बंद केल्या आहेत त्यामुळे इम्रान ताहिर, टब्रेझ शाम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, रिली रोसूव, ॲनरीच नॉर्ट्जे आणि कॉलीन इंग्राम यांना कॅरिबियन प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होता येणार नाही. अशा परिस्थितीत आफ्रिकन खेळाडूंचे आयपीएलमध्ये खेळणे हे विमान वाहतूक सुरू होण्यावर अवलंबून आहे. (South African cricketers doubtful for IPL 2020)

"क्रिकेट दक्षिण आफ्रिका खेळाडूंना नक्कीच ना हरकत प्रमाणपत्र देईल, परंतु विमान वाहतूक सुरू करणे आमच्या हातात नाही," असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मीडिया मॅनेजर कोकेत्सो गाओफेटोग यांनी सांगितले आहे.  भारताप्रमाणे आफ्रिकेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आतापर्यंत तेथे 4.21 लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे आणि फक्त आप्तकालीन परिस्थितीतच प्रवासाला सरकारकडून परवानगी आहे. (South African cricketers doubtful for IPL 2020)

आफ्रिकन खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी न झाल्यास, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघांना सर्वाधिक फटका बसू शकतो. दोन्ही संघांत प्रत्येकी 3 आफ्रिकन खेळाडू आहेत. दहा खेळाडूंसाठी आयपीएल फ्रँचायझींनी एकूण 34.6 कोटी रुपये मोजले आहेत. आफ्रिकन खेळाडूंना आयपीएलमध्ये न खेळल्यास 34.6 कोटींचे नुकसान होऊ शकते. 

कोणकोणते खेळाडू...एबी डिव्हिलियर्स ( RCB), ख्रिस मॉरीस ( RCB), कागिसो रबाडा ( DC), क्वींटन डी'कॉक ( MI), डेल स्टेन ( RCB), फॅफ ड्यू प्लेसिस ( CSK), इम्रान ताहीर ( CSK), हार्डस विलजोन ( KIXP), डेव्हीड मीलर ( RR), लुंगी एनगिडी ( CSK). 

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीएबी डिव्हिलियर्स