Join us

IPL 2020: गियर बदल, फटकेबाजीला सुरूवात कर; सेहवागनं कोहलीच्या स्ट्राइक रेटवर खडा केला सवाल 

या सत्रात कोहलीला आपल्या चांगल्या सुरूवातीला मोठ्या खेळीत बदलण्यात अपयश आले आहे. यासोबतच सेहवागने कोहलीच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे रॉयल चँलेजर्स बंगलुरूचा संघ यंदा अडचणीत येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 14:11 IST

Open in App

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने लवकरात लवकर फटकेबाजीला सुरूवात करावी, असा सल्ला भारताचा माजी सलामीवीर आणि तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने दिला आहे. विरेंद्र सेहवागने सांगितले, की आयपीएल २०२०मध्ये विराट कोहलीला अद्याप त्याच्या लौकिकाप्रमाणे फलंदाजी करता आलेली नाही. ज्यासाठी तो ओळखला जातो.

या सत्रात कोहलीला आपल्या चांगल्या सुरूवातीला मोठ्या खेळीत बदलण्यात अपयश आले आहे. यासोबतच सेहवागने कोहलीच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे रॉयल चँलेजर्स बंगलुरूचा संघ यंदा अडचणीत येऊ शकतो.

सेहवागने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले,‘कोहलीने या सत्रात १४ सामन्यात ४६० धावा केल्या आहेत. मात्र त्याचा स्ट्राईक रेट फक्त १२२.०१ आहे. जर तो दिल्लीविरोधातील सामन्यात बाद झाला नसता तर त्याने ४० चेंडूत ७० किंवा ८० धावा केल्या असत्या आणि आरसीबीच्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारता आली असती. तो लवकर बाद झाला तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट ११० च्या आसपास होता.

आरसीबीने आयपीएल २०२० च्या प्ले ऑफमध्ये जागा बनवली आहे. त्याचा सामना इलिमिनेटरमध्ये सनरायजर्स बरोबर होणार आहे. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूला आपल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. 

टॅग्स :IPL 2020आयपीएलविरेंद्र सेहवागविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर