Join us

IPL 2020: धोनीला पहिल्यांदाच इतके थकलेले पाहिले; आकाश चोप्राची भावनिक प्रतिक्रिया

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Akash Chopra) यानेही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 13:48 IST

Open in App

मुंबई : Indian Premier League (IPL 2020)  प्रत्येक सत्रात गुणतालिकेमध्ये पहिल्या चार स्थानांमध्ये हमखास जागा मिळवणारा चेन्नई सुपरकिंग्ज (ChennaI Superkings) संघ सध्या तळाच्या स्थानी आहे. सलग तीन पराभव पत्करल्याने चेन्नईची तळाला घसरण झाली आहे. हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hydrabad) खेळताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) अत्यंत थकलेला दिसला. यामुळे त्याला जोरदार फटकेही मारणे जमत नव्हते. यावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Akash Chopra) यानेही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सलामीला कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सला सहज नमवून दणक्यात सुरुवात केलेल्या चेन्नईला आपल्या पुढील तीन सामन्यांत अनुक्रमे राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यात फिनिशर म्हणून आपली भूमिका चोखपण सांभाळणारा धोनी प्रचंड थकलेला दिसला. हे दृश्य पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी दु:खी झालाच, शिवाय धाप टाकणाऱ्या धोनीची अवस्था पाहून अनेकांना वाईट वाटले

गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात हैदरबादने चेन्नई सुपरकिंग्जला ७ धावांनी नमविले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला ५ बाद १६४ धावांवर समाधान मानावे लागले. यानंतर  हैदराबादने चेन्नईला ५ बाद १५७ धावांवर रोखले. चेन्नईची नवव्या षटकात ४ बाद ४२ अशी अवस्था झाली. यानंतर धोनी व रविंद्र जडेजा यांनी झुंज दिली. १९व्या षटकात भुवनेश्वर पायाचे स्नायू दुखावल्याने मैदानाबाहेर गेला. याचा फायदा घेत धोनीने सामना चेन्नईच्या अवाक्यात आणला. मात्र दमछाक झाल्याने त्याला जोरदार फटके मारता आले नाही.

यावर आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली की, ‘मी थोडा भावूक झालो, कारण मी पहिल्यांदाच धोनीला इतके थकलेले पाहिले आहे. तो खूप वाकत होता, त्याला नीट श्वासही घेता येत नव्हते. त्याचा घसाही सुकला होता.’  

टॅग्स :एम. एस. धोनीचेन्नई सुपर किंग्सIPL 2020