दुबई : सलग पराभवामुळे मनोधैर्य ढासळलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला रविवारी सनरायजर्सविरुद्धच्या लढतीत स्टोक्सच्या आगमनामुळे विजयी मार्गावर परतण्याची आशा आहे. रॉयल्स गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानी आहे. दोन विजयानंतर त्यांना सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. सनरायजर्स संघ सहापैकी तीन सामन्यांत विजय मिळवित गुणतालिकेत तिसºया स्थानी आहे. स्टोक्सचा अनिवार्य विलगीकरण कालावधी शनिवारी संपणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल ढासळला होता. आता त्यांच्या संघाचा समतोल साधल्या जाण्याची अपेक्षा आहे.
मजबूत बाजू
राजस्थान। बेन स्टोक्सचे संघात पुनरागमन. यशस्वी जयस्वाल, राहुल तेवतिया यांची चमकदार कामगिरी.
हैदराबाद। जॉन बेयरस्टॉ आणि फिरकीपटू राशीद खान यांची शानदार कामगिरी.
कमजोर बाजू
राजस्थान। सलग पराभवामुळे मनोधैर्य ढासळले. संघाचा समतोल ढासळला.
हैदराबाद। भुवनेश्वर कुमार व अष्टपैलू मिशेल मार्श संघाबाहेर.