Join us

IPL 2020, RR vs DC Match: कॅपिटल्सविरुद्ध पराभवाची परतफेड करण्यास रॉयल्स प्रयत्नशील

Rajasthan Royals vs Delhi Capitals IPL Match: पहिल्या फेरीनंतर गुणतालिकेत दिल्ली दहा गुणांसह दुसऱ्या तर राजस्थान सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:55 IST

Open in App

दुबई : बेन स्टोक्सच्या आगमनामुळे मजबूत झालेला राजस्थान रॉयल्स संघ आघाडीच्या फळीतील अपयशातून सावरत बुधवारी येथे खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध यापूर्वी झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास प्रयत्नशील असेल.

दिल्लीने गेल्या आठवड्यात रॉयल्सचा ४६ धावांनी पराभव केला होता. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील रॉयल्स संघ त्यापासून बोध घेत कडवे आव्हान देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. यापूर्वी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत रॉयल्स संघात स्टोक्स नव्हता. इंग्लंडच्या या अष्टपैलूला गेल्या लढतीत आपली छाप सोडता अली नाही, पण त्याच्या उपस्थितीत त्यांनी माजी चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवत पराभवाची मालिका खंडित करण्यात यश मिळवले. पहिल्या फेरीनंतर गुणतालिकेत दिल्ली दहा गुणांसह दुसऱ्या तर राजस्थान सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.वेदर रिपोर्ट । तापमान ३६ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी २८९ टक्के तर हवेचा वेग २४ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता.पीच रिपोर्ट । खेळपट्टीकडून गोलंदाजांना आशा, पण फलंदाजांना स्थिरावल्यानंतर धावा फटकावण्याची संधी.मजबूत बाजूदिल्ली । आक्रमक फलंदाज. रबाडासह ,एनरिच नॉज, हर्षल पटेल यांची दमदार कामगिरी.राजस्थान। बेन स्टोक्सचे आगमन. तेवतियाचा फॉर्म. कर्णधार स्टीव्ह स्मिथचा अनुभव.कमजोर बाजूदिल्ली । पंत दुखापतग्रस्त झाल्यामुळे समतोल ढासळला.राजस्थान। आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे फलंदाजांवर दडपण.

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सडीसी