Join us  

IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 2:59 PM

Open in App

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना ( Opening Match) होणार आहे. मुंबई इंडियन्स ( MI) पाचव्या जेतेपदासाठी सज्ज आहेत आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यासह सर्व खेळाडूंनी सरावात तुफान फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी केली आहे. CSKही त्यांना तोडीस तोड देण्यासाठी सज्ज आहेत. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही ( MS Dhoni)  सरावात जोरदार फटकेबाजी केली. पण, आयपीएलसाठी मैदानावर उतरण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, रोहित, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), शिखर धवन ( Shikhar Dhawan), जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि रिषभ पंत  ( Rishabh Pant) गल्ली क्रिकेट खेळताना दिसले.

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

कोरोना व्हायरसमुळे IPL2020 होणार की नाही, यावर साशंकता होती. आशिया कप, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आदी स्पर्धांसह ICCनं अनेक मालिकाही रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यात देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, यंदाच्या आयपीएलवरही टांगती तलवार होती. 29 मार्च 2020 पासून सुरू होणारी ही स्पर्धा दोन वेळा स्थगित करण्यात आली. पण, अखेर BCCIनं सर्व गणित जमवलं आणि UAEत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. IPL 2020ची घोषणा होण्यापूर्वी भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर Vivoने टायटल स्पॉन्सरवरून माघार घेतली. त्यामुळे BCCIला नवा टायटल स्पॉन्सर सोधावा लागला.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

ड्रीम 11नं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली. स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती.  ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली. याच Dream 11नं आयपीएलसाठी एक गाणं तयार केलं आहे आणि त्यात टीम इंडियाचे दिग्गज गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल 2020रोहित शर्माजसप्रित बुमराहमहेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्याशिखर धवनरिषभ पंत