Join us

IPL 2020: विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवा; गौतम गंभीरची मागणी

पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 07:03 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘विराटच्या निराशादायी कामगिरीनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरच्या कर्णधारपदावरून त्याची उचलबांगडी करण्याची वेळ आली आहे. विराटने स्वत:हून पुढे येत जबाबदारी स्वीकारावी,’ असे खडेबोल सुनावत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने कोहलीच्या हकालपट्टीची मागणी केलीे.

क्रिकइन्फोने गंभीरला, ‘फ्रेन्चाईजीचा प्रभारी असता तर संघाचा कर्णधार बदलला असता का? असा सवाल केला होता. त्यावर खासदार असलेला गंभीर म्हणाला, ‘कोणत्याही स्पर्धेत आठ वर्षे हा मोठा कालावधी असतो. कर्णधाराच्या बाबतीत विसरून जा. पण कोणताही असा खेळाडू सांगा जो आठ वर्षे झाली असतील आणि एकदाही स्पर्धेचे विजेतेपद पटकावले नाही. एका कर्णधाराला उत्तर देणे आवश्यक आहे.’ 

पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला. एकदा स्वप्न भंगले आहे.   हैदराबादने विराट कोहलीच्या आरसीबीवर ६ गडी राखून मात केली.  पराभवानंतर कोहलीवर निशाणा साधताना गंभीर म्हणाला, ‘आरसीबीला कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या पुढे विचार करावा लागेल, ही वेळ आली आहे.  टीम मॅनेजमेंटमध्ये आपण असतो तर विराटला कर्णधारपदावरून हटवले असते.  केवळ या वर्षाची गोष्ट नाही.

मी विराटच्या विरोधात मुळीच नाही. परंतु कुठे ना कुठे त्याला जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, रविचंद्रन अश्विनच्या बाबतीत काय घडलं? किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये त्याची कामगिरी उत्तम झाली नाही त्यानंतर त्याला हटवण्यात आले.  आपण धोनीच्या, रोहितच्या बाबत चर्चा करतो. परंतु विराट कोहलीबाबत काहीच बोलत नाही. 

धोनीने तीनदा विजेतेपद पटकावले आहे. रोहितच्या मुंबईने चार वेळा स्वत:ला सिद्ध केल्यामुळेच दोघेही दीर्घकाळ कर्णधार आहेत. निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळी गोष्टी असू नये.’ डिव्हिलियर्ससाठी हे सत्र खराब ठरले असते, तर आरसीबीची अवस्था कशी झाली असती, याची कल्पना करा, असेही गंभीर म्हणाला.

टॅग्स :विराट कोहलीगौतम गंभीर