Join us

IPL 2020 RCB VS RR: अखेर विराटला गवसला सूर; बँगलोरची राजस्थानवर आठ गड्यांनी मात

IPL 2020 RCB VS RR: कोहली, पडीक्कलची अर्धशतकी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 05:52 IST

Open in App

अबुधाबी : विराट कोहलीला चौथ्या सामन्यात अखेर सूर गवसला. त्याने नाबाद ७२ धावांचा झंझावात करताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला शनिवारी राजस्थान रॉयल्सवर आठ गड्यांनी सहज विजय मिळवून दिला. विराटने सात चौकार आणि दोन षटकार ठोकून सलामीवीर देवदत्त पडीक्कलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली.पडीक्कलने यंदा तिसऱ्यांदा अर्धशतकी खेळी करीत ४५ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ६३ धावांचे योगदान दिले. फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या भेदक माºयापुढे राजस्थान रॉयल्स संघ ६ बाद १५४ पर्यंत मजल गाठू शकला. कोहलीच्या संघाने पाच चेंडू आधीच २ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा करत सलग दुसरा विजय नोंदवला. चहलने २४ धावात ३ गडी बाद केले. पंजाबच्या मोहम्मद शमीसह तो गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थानावर आहे.त्याआधी, मागच्या सामन्यात मुंबईला नमवणाºया राजस्थानला आरसीबीच्या गोलंदाजांपुढे मोकळीक मिळाली नाही. तथापि अष्टपैलू महिपाल लोमरोर याने ३९ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारला. त्याच्या ४७ धावांच्या बळावर राजस्थानने आव्हानात्मक मजल गाठली. स्टीव्ह स्मिथ ५, अ‍ॅरोन फिंच ८आणि जोस बटलर २२ हे लवकर बाद झाले. नाबाद २४ धावा करणारा राहुल तेवतिया आज पुन्हा मोठी फटकेबाजी करण्याच्या इराद्याने आला होता. नवदीप सैनीचा चेंडू छातीवर आदळल्यानंतरही त्याने अखेरच्या षटकात दोन षटकार खेचले, हे विशेष.सामन्यातील रेकॉर्डचौथ्या सामन्यात तिसरे अर्धशतक नोंदवणारा देवदत्त पडीक्कल आयपीएलमध्ये पहिला खेळाडू ठरला. देवदत्तने पहिल्या सामन्यात ५४, दुसºया सामन्यात १ तिसºया सामन्यात ५४ आणि आज ६३ धावा केल्या.टर्निंग पॉइंटदोन फिरकीपटू युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांनी आपल्या ८ षटकांत केवळ ४४ धावा दिल्या. चहलने तीन बळी घेतले.विनिंग स्ट्रॅटेजीफिंच लवकर बाद झाल्यानंतर पडीक्कलने एक टोक सांभाळत धावफलक हलता ठेवण्याची भूमिका चोख बजावली. पडीक्कल बाद झाल्यानंतर कोहलीने आक्रमक पवित्रा स्वीकारला.

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स