Join us

IPL 2020 : RCBने बदलला आपला लोगो, वायरल झाला व्हिडीओ...

RCBनं बुधवारी तसे संकेत दिले होते. त्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवरील प्रोफाईल फोटो हटवले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नावाऐवजी केवळ रॉयल चॅलेंजर्स असे नाव ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 19:13 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली होती. RCBनं बुधवारी तसे संकेत दिले होते. त्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवरील प्रोफाईल फोटो हटवले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नावाऐवजी केवळ रॉयल चॅलेंजर्स असे नाव ठेवले. 

आज आरसीबीने आपल्या ट्विटर हँडलवर आपला नवीन लोगो शेअर केला आहे. या लोगोमध्ये लाल रंग कायम ठेवण्यात आला आहे. पण या लोगोमध्ये पूर्वी असलेला सिंह पुन्हा पाहायला मिळणार आहे. या लोगोमध्ये सिंहाचा रंग लाल ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे RCBच्या मनात नक्की चाललंय का, याचा अंदाज नेटिझन्स घेऊ लागले. पण, हे सर्व करताना RCBनं कर्णधार विराट कोहलीला विश्वासात घेतलं नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे. विराट कोहलीनं ट्विट करून आपण अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. त्यावरून कोहली या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बुधवारी RCBनं त्यांच्या ट्विटर, इस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलेला लोगो अचानक काढला. शिवाय त्यांनी RCBहे नाव न ठेवता केवळ रॉयल चॅलेंजर्स असंच ठेवल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार RCBत्यांच्या नावात ‘Bangalore’ याऐवजी आता ‘Bengaluru’ असं लिहीणार आहे आणि 16 फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आता नावात बदल केल्यानंतर तरी RCBचं नशीब उजळणार का, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत.

टॅग्स :आयपीएलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीयुजवेंद्र चहल