Join us

IPL 2020: राजस्थान रॉयल्सने उडवली 'सनरायझर्स हैदराबाद'ची खिल्ली

राजस्थान ने झोमॅटो इंडिया ला टॅग करत ट्विट केले की आम्हाला एक लार्ज बिर्याणी हवी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 16:00 IST

Open in App

11 ऑक्टोबरला वर्ल्ड बिर्याणी डे होता. आणि नेमका याच दिवशी राजस्थानचा हैदराबाद बरोबर सामना होता या सामन्याचे निमित्त साधून राजस्थान रॉयल्स ने ट्विटरवर सनरायझर्स हैदराबादची चांगलीच खिल्ली उडवली.

राजस्थान ने झोमॅटो इंडिया ला टॅग करत ट्विट केले की आम्हाला एक लार्ज बिर्याणी हवी आहे. त्यावर त्यांनीही ने तेवढाच शानदार रिप्लाय दिला. डिलिव्हरीे कंपनीने लिहिले की, आम्ही बिर्याणी पाठवत आहोत पण अशा आहे किती आधी तुम्ही सनरायझर्सला संपवाल. त्याची आता सोशल मीडिया खिल्ली उडवली जात आहे. यावर वेगवेगळे मिमस ही व्हायरल होत आहेत.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने सनरायझर्स हैदराबाद वर पाच गडी राखून विजय मिळवला या विजयानंतर रियान पराग याने आसामचा बिहू डान्स करत जोरदार सेलिब्रेशन केले त्याच दरम्यान राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या राहुल तेवतिया आणि हैदराबादच्या खलील अहमद यांच्या जोरदार वादही झाला होता. या सामन्यात रियान पराग याने 42 तर राहुल तेवतिया याने 45 धावांची शानदार खेळी करत राजस्थान रॉयल्स ला विजय मिळवून दिला.

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद