Join us

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचे फर्स्ट आणि लास्ट स्थानातही सर्वाधिक विजय 

आयपीएलच्या (IPL)  इतिहासात राजस्थान राॕयल्स (Rajsthan Royals)  हा शेवटच्या स्थानी राहिलेला पहिला माजी विजेता संघ ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 18:29 IST

Open in App

-ललित झांबरे

आयपीएलच्या (IPL)  इतिहासात राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals)  हा शेवटच्या स्थानी राहिलेला पहिला माजी विजेता संघ ठरला आहे. माजी विजेत्यांपैकी कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR)  संघसुध्दा 2009 मध्ये शेवटच्या स्थानी होता पण राजस्थान आणि त्यांच्यात फरक हा आहे की, केकेआरचा संघ 2009 मध्ये शेवटी आला तेंव्हा तो माजी विजेता नव्हता.त्यांनी 2012 व 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर ते कधीच शेवटच्या स्थानी आले नाही.

राजस्थानचा संघ पहिल्यांदाच शेवटच्या स्थानी आला आहे. मात्र ते आयपीएलच्या पहिल्याच सिझनचे (2008) विजेते आहेत. या दोन संघाशिवाय आयपीएलमध्ये जे संघ शेवटच्या स्थानी राहिलेले आहेत ते दिल्ली (DC)- 4 वेळा,  किंग्ज इलेव्हन- 3 वेळा,  रॉयल चॅलेंजर्स- 2 वेळा डेक्कन चार्जर्स आणि पुणे वॉरियर्स हे आयपीएल जिंकू शकलेले नाहीत तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे माजी विजेते कधीच शेवटच्या स्थानी आलेले नाहीत. 

राजस्थानने शेवटचे स्थान गाठताना एक विक्रम केलाय तो असा की विजेतेपद पटकावताना त्यांनी 2008 मध्ये सर्वाधिक 11 सामने जिंकले होते आणि आता शेवटच्या स्थानी असतानाही त्यांनी सर्वाधिक 6 सामने जिंकले आहेत. याप्रकारे नंबर वन ते नंबर लास्ट पण विजय सर्वाधिक हा राजस्थानचा अनोखा विक्रम आहे.

शेवटच्या स्थानी आलेल्या कोणत्याही संघाने आतापर्यंत सहा सामने जिंकलेले नव्हते आणि 12 गूण कमावलेले नव्हते. शेवटच्या स्थानावरील संघाचे याआधीचे सर्वाधिक विजय (5) व सर्वाधिक गूण (11) गेल्यावर्षीच राॕयल चॕलेंजर्सने नोंदवले होते. आता राजस्थानचे 6 विजय व 12 गूण आहेत. 

आयपीएलच्या एका सत्रात राजस्थानशिवाय किंग्ज इलेव्हन, चेन्नई, दिल्ली व मुंबईनेही 11 विजय मिळवले आहेत पण किंग्ज व दिल्लीचे संघ आयपीएल जिंकू शकलेले नाहीत तर दिल्ली, मुंबई व चेन्नईने 11 विजय नोंदवले त्या सत्रात 16-16 सामने प्रत्येक संघाला खेळायला मिळाले होते. राजस्थानने मात्र 14 सामन्यांतच 11 विजय मिळवले होते. 

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्स