IPL 2020 : १० ऑक्टोबरनंतरच खेळणार राजस्थानचा ‘हा’ हुकमी अष्टपैलू

IPL 2020 News : यंदाच्या सत्रात सलग दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केलेल्या राजस्थानला नंतर सलग तीन सामने गमवावे लागले. त्याचवेळी आता राजस्थानचा पुढील सामना शुक्रवारी होणार तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 16:38 IST2020-10-07T16:37:11+5:302020-10-07T16:38:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020: Rajasthan Royal's all-rounder Ben Stokes to play only after October 10 | IPL 2020 : १० ऑक्टोबरनंतरच खेळणार राजस्थानचा ‘हा’ हुकमी अष्टपैलू

IPL 2020 : १० ऑक्टोबरनंतरच खेळणार राजस्थानचा ‘हा’ हुकमी अष्टपैलू

 मुंबई - राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) Indian Premier League (IPL 2020) मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यातून त्यांना सलग तिस-या पराभवास सामोरे जावे लागले. अशावेळी राजस्थानला कमतरता भासतेय ती आपल्या टॉप आॅलराऊंडरची. मात्र हा हुकमी खेळाडू आता १० ऑक्टोबरनंतरच खेळू शकणार असल्याची माहिती राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिली. हा हुकमी खेळाडू म्हणजे बेन स्टोक्स (Ben Stokes) .

यंदाच्या सत्रात सलग दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केलेल्या राजस्थानला नंतर सलग तीन सामने गमवावे लागले. त्याचवेळी आता राजस्थानचा पुढील सामना शुक्रवारी होणार तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध. त्यामुळेच राजस्थानला अडचणीचा सामना करावा लागत असून त्यांना स्टोक्सची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे.

राजस्थानच्या आघाडीच्या फळीसह मधली फळी गेल्या तिन्ही सामन्यांत अपयशी ठरली आहे. अशावेळी राजस्थानला इंग्लंडचा स्टार अष्टपैलू स्टोक्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्याच आठवड्यात स्टोक्स यूएईमध्ये आला. मात्र नियमानुसार तो क्वारंटाईन काळामध्ये असून ९ आॅक्टोबरला होणाºया दिल्लीविरुद्धही तो खेळू शकणार नाही.
मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने माहिती दिली की, स्टोक्स १० ऑक्टोबर नंतरच खेळेल. त्यामुळेच आता ११ ऑक्टोबरला होणाºया सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्टोक्स राजस्थानकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, या सामन्याआधी स्टोक्सचा कोरोना अहवाल निगेटीव्ह येणेही गरजेचे आहे. वडील आजारी असल्याने स्टोक्स न्यूझीलंडला गेला होता. वडीलांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर स्टोक्स ऑगस्ट  महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. 

 

Web Title: IPL 2020: Rajasthan Royal's all-rounder Ben Stokes to play only after October 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.