Join us  

IPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट 

राहुलनं किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळताना पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. नंतर त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 7:15 AM

Open in App

 राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) अष्टपैलू खेळाडू राहुल टेवाटियानं आपल्याच खेळीला ट्रोल केले आहे. २०१८ नंतर पहिल्यांदाच ट्विट करत राहुलनं स्वत:चीच खिल्ली उडवली आहे. त्याने मंगळवारी ट्विट केले की, ‘सॉरी, मित्रांनो मी लेट आहे.’

राहुलनं किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळताना पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. नंतर त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. त्याच्या सुरूवातीच्या संथ आणि नंतरच्या तडाखेबाज खेळीची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आताही राहुलनं असाच प्रकार केला आहे. राहुलनं तब्बल दोन वषार्नंतर आपले पहिले ट्विट केले आहे. त्याने १४ ऑक्टोबर २०१८ ला गौतम गंभीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्याने एकही ट्विट केले नव्हते. 

मंगळवारी २९ सप्टेंबरला ट्विट करत सोशल मिडियावर स्वत:चीच फिरकी घेतली आहे. सोशल मिडियावर फारसा सक्रिय नसलेल्या राहुलला ट्विटवर ३७.४ हजार जण फॉलो करतात.  तर तो स्वत: फक्त पाच अकांऊटला फॉलो करतो. त्यात राजस्थान रॉयल्स, विराट कोहली, सुरेश रौना यांचा समावेश आहे.

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सकिंग्स इलेव्हन पंजाब