Join us

IPL 2020 Auction: T10मध्ये 25 चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाची हवा; 332 खेळाडूंवरच लागणार बोली

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 13:33 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावांची नोंदणी केली होती, परंतु आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. आयपीएल आयोजकांनी शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 

24 नव्या खेळाडूंचा समावेश असून यात वेस्ट इंडिजडा केस्रीक विलियम्स, बांगलादेशचा कर्णधार मुश्फीकर रहीम आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा यांचा समावेश आहे. याशिवाय सरे संघाचा 21 वर्षीय फलंदाज विल जॅक्स याची एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे. जॅक्सनं संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी 10 सामन्यात लँकरशायरविरुद्ध 25 चेंडूंत शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. 332 खेळाडूंपैकी केवळ 73 खेळाडूंची निवड होणार असून त्यात 29 परदेशी खेळाडू असणार आहेत.

कोणीची किती मुळ किंमत2 कोटीः पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया), ख्रिस लीन ( ऑस्ट्रेलिया), मिचल मार्श ( ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅक्सवेल ( ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन ( दक्षिण आफ्रिका), अँजेलो मॅथ्यूज ( श्रीलंका).

1.5 कोटी मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये  रॉबीन उथप्पा या एकमेव भारतीय खेळाडूनं स्थान पटकावले आहे. त्याच्याशिवाय या गटात  शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया), केन रिचर्डसन ( ऑस्ट्रेलिया), इयॉन मॉर्गन ( इंग्लंड), जेसन रॉय ( इंग्लंड), ख्रिस वोक्स ( इंग्लंड), डेव्हिड विली (इंग्लंड), ख्रिस मॉरिस ( दक्षिण आफ्रिका), कायले अबॉट ( दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे. यांच्यासह पियूष चावला, युसूफ पठाण आणि जयदेव उनाडकट यांना 1 कोटी  मुळ किंमतीच्या गटात स्थान मिळाले आहे.

मुळ किमतींची गटवारीमुळ किंमत     एकूण    भारतीय    परदेशी2 कोटी        7    0    71.5 कोटी        10    1    91 कोटी        23    3    2075 लाख        16    0    1650 लाख        78    9    69

अनकॅप खेळाडू40 लाख        7    1    6    30 लाख        8    5    320 लाख        183    167    16 

आठ संघांचा 'बजेट' चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी - ५ खेळाडू ( २ परदेशी)दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी - ११ खेळाडू ( ५ परदेशी) किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी - ९ खेळाडू ( ४ परदेशी)कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी - ११ खेळाडू ( ४ परदेशी)राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी- ११ खेळाडू ( ४ परदेशी)मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी - १२ खेळाडू ( ६ परदेशी)

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020