Join us

IPL 2020 : प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो - श्रेयस अय्यर  

IPL 2020 News : खुप कठीण आहे. मी संघाबाबत काहीही नकारात्मक बोलणार नाही. जेव्हा आम्ही दोन बळी घेतले होते. तेव्हा १३-१४ षटकांत ११० धावांवर होते. तेव्हा आम्ही चांगल्या स्थितीत होतो. ही संधी होती. त्याचा आम्ही फायदा घ्यायला हवा होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 12:26 IST

Open in App

 आयपीएल २०२० च्या आधी क्वालिफायर मध्ये मुंबई इंडियन्सकडून झालेल्या दारुण पराभवानंतर ५७ धावांकडून त्याचा पराभव झाला आहे. त्यानंतर बोलताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ने सांगितले की, मी संघाबाबत काहीही नकारात्मक बोलु इच्छित नाही. पुढे जाण्यासाठी आम्ही मजबुत मानसिकतेने पुनरागमन करु. हा खेळाचा भाग आहे.’ मुंबई विरोधातील निराशाजनक पराभवानंतर स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यर हा निराश दिसत होता.आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. दिल्लीला अंतिमसामन्यात प्रवेश करण्यासाठी दुस-या क्वालिफायरचा पर्याय आहे.  दुस-या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवून दिल्लीचा संघ अंतिम सामन्यात पोहचुशकतो. अय्यर म्हणाला की, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो. गुरूवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीच्या समोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीने आठ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावा केल्या.्अय्यर पुढे म्हणाला की,‘ खुप कठीण आहे. मी संघाबाबत काहीही नकारात्मक बोलणार नाही. जेव्हा आम्ही दोन बळी घेतले होते. तेव्हा १३-१४ षटकांत ११० धावांवर होते. तेव्हा आम्ही चांगल्या स्थितीत होतो. ही संधी होती. त्याचा आम्ही फायदा घ्यायला हवा होता. या खेळपट्टीवर आम्ही १७० धावांचे लक्ष्यगाठु शकलो असतो. ’

टॅग्स :IPL 2020