Join us

IPL 2020: नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलण्याची गरज नाही- गावसकर

IPL 2020: चांगला व गुणी खेळाडू नेहमीच पुढे जात राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 04:14 IST

Open in App

आयपीएलच्या १३ व्या पर्वात युवा भारतीय खेळाडू देदीप्यमान कामगिरी करत आहेत. बीसीसीआयने राष्टÑीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून जी मेहनत घेतली, त्याचा हा यशस्वी परिणाम आहे. स्थानिक क्रिकेट, त्यातही विविध वयोगटांच्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित केल्याचा लाभ म्हणायला हवा, असे मत दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, ‘आधीचे क्रिकेट काही राज्यांपुरते मर्यादित होते. गेल्या ३० वर्षांत अनेक राज्यांत क्रिकेटचे मूळ घट्ट झाले. यात शानदार कव्हरेज आणि स्थानिक भाषेत होणारे समालोचन यांचादेखील मोठा वाटा आहे. ज्या राज्यांत क्रिकेट नंबर वन खेळ नव्हता, तेथे प्रतिभावान खेळाडूंच्या उदयामुळे या खेळाला राजाश्रय लाभला.’ केवळ भारतीय क्रिकेट त्या खेळाडूसाठी महत्त्वाचे मानले जाते,’ असे गावसकर म्हणाले.ज्युनियर खेळाडूंमधून आलेला हैदराबादचा प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा या युवकांनी स्वतंत्र फटकेबाजी करून सामन्याचा निकाल फिरवला. अन्य संघातही असे गुणी खेळाडू आहेत. केकेआरचा कमलेश नागरकोटी, शुभमान गिल, शिवम मावी, आरसीबीचे देवदत्त पडीक्कल आणि नवदीप सैनी, मुंबई इंडियन्सचा ईशान किशन, राजस्थानचे संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया हे सर्वजण बीसीसीआयच्या वयोगटातील स्पर्धांच्या माध्यमातून पुढे आले. या खेळाडूंच्या जखमांवर मोठा खर्च करून करून त्यांना मैदानावर परत आणल्यामुळे एनसीए प्रशंसेस पात्र ठरत असल्याचे मत गावसकर यांनी व्यक्त केले.‘एनसीएने राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात यातील गुणी खेळाडूंवर मेहनत घेतली. त्यांच्यातील टॅलेंटला वाव दिला. खेळाडू कसा खेळतो, यावर एनसीएचे लक्ष असते. तो कुठून आला, याच्याशी काही देणेघेणे नसते. त्या खेळाडूला कुठली भाषा येते, हेदेखील पाहिले जात नाही. चांगल्या खेळाडूला पुढे घेऊन जाणे हे एकमेव काम येथे केले जाते. कोणत्याही खेळाडूला संघाचे नेतृत्व करण्यासाठी इंग्रजी बोलता येणे अनिवार्य असण्याची गरज नाही.

टॅग्स :IPL 2020