Join us  

IPL 2020 : सलामीचा सामना मुंबई इंडियन्सच्या वाट्याला येणं धोक्याचं; आकडेवारी देतेय सूचक इशारा

IPL 2020 : गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना अबु धाबी येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 7:12 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे 13 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर न झाल्यानं क्रिकेटचाहते नाखुश होते. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 11 सदस्यांना कोरोना लागण झाल्यामुळे स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानं चाहत्यांच्या चिंतेत भर पडली. पण, प्रतिक्षेनंतर अखेर बीसीसीआयनं रविवारी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना अबु धाबी येथे खेळवण्यात येणार आहे.

IPL 2020 : सुरेश रैना, भज्जीच्या माघारीनं CSKचं टेंशन वाढवलं; महेंद्रसिंग धोनीच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020 : मुंबई इंडियन्स कोणाशी व कधी भिडणार, जाणून घ्या रोहित शर्माच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020 : रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

सलामीचा सामना मुंबई इंडियन्सच्या वाट्याला आल्यानं चाहते आनंदात असतील, परंतु त्यांच्यासाठी ही गोष्ट चिंता वाढवणारी ठरू शकते. त्यात संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाची आयपीएल खेळणार नसल्यानं कर्णधार रोहित शर्माचं टेंशन आणखीन वाढलं आहे. मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता. मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे.  

आयपीएलचा पहिला सामना अन् धक्कादायक आकडेवारीमुंबई इंडियन्सनं यापूर्वी सहावेळा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला आहे. त्यात फक्त एकदा मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावता आले, तर एकदाच ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकले आहेत. 2009मध्ये मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला अन् त्या पर्वात संघाला 7व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2012 आणि 2014मध्ये सलामीचा सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2015मध्ये मात्र त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. 2016 आणि 2018मध्ये त्यांना पाचव्या स्थानापर्यंत मजल मारता आली. 

सुरेश रैनाला खेळायचंय, पण त्याला परवानगी मिळणार का? BCCIनं स्पष्टच सुनावलं

विराट कोहलीच्या RCBचा पहिलाच मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी; पाहा त्यानंतर कोणाकोणाला टक्कर देणार 

चेन्नई सुपर किंग्ससाठी शुभसंकेतचेन्नई सुपर किंग्स यापूर्वी पाचव्यांदा सलामीचा सामना खेळले. 2009मध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. 2011मध्ये ते चॅम्पियन ठरले, तर 2012मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  2018मध्ये त्यांनी पुन्हा जेतेपद पटकावले, तर 2019मध्ये उपविजेते ठरले.  

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स