Join us  

IPL 2020 mid-season transfer : फॉर्मात आलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं घेतला महत्त्वाचा निर्णय; CEOनी दिली माहिती 

Mid Season Transfer Window साठी किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी उत्सुकता दाखवली आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 14, 2020 4:03 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) मंगळवारी सनरायझर्स हैदराबादला ( Sunrisers Hyderabad) वर विजय मिळवून Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील Play Offच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. त्यात यंदाच्या आयपीएलमध्ये Mid Season Transfer Window सुरू झाल्यानं CSK संघात काही बदल करतील अशी चर्चा सुरू होती. सलामीचा तिढा सोडवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स अजिंक्य रहाणेसाठी आग्रही असतील, अशाही बातम्या आल्या होत्या. पण, दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) रहाणे संघात कायम राखण्याचे जाहीर केले. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सनेही Mid Season Transfer Window बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mid Season Transfer Window साठी किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी उत्सुकता दाखवली आहे, परंतु चेन्नई सुपर किंग्सनं यात सहभाग घेणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. CSK इम्रान ताहीरला ट्रेड करतील अशी चर्चा होती, ताहीरनं आतापर्यंत IPL2020त एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा होती, दिल्ली कॅपिटल्स त्याला घेण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले जात होते. पण, CSKचे  मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात!

त्यांना सांगितले की,''इम्रान ताहीर पुढील सामन्यांत खेळेल. सध्याच्या घडीला येथील खेळपट्टीनुसार आम्ही दोन परदेशी फलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडू या रणनीतीनं मैदानावर उतरत आहोत. पण, आता दुसऱ्या टप्प्यात खेळपट्टीची फिरकीला मदत मिळेल आणि तेव्हा ताहीर संघात असेल. तुम्हाला संघात चारच परदेशी खेळाडू खेळवता येतील, त्यानुसार प्लान करावं लागतं.''

विश्वनाथन यांनी पुढे सांगितले की,''Mid Season Transfer Windowत आम्ही कोणत्याही खेळाडूला घेणार नाही किंवा देणार नाही. आम्ही कोणत्याही खेळाडूला संघात घेण्याचा विचार करत नाही. अन्य फ्रँचायझी त्यासाठी तयार असतील, असे मला वाटत नाही. लिलावात काही रणनीती तयार करूनच खेळाडूंना फ्रँचायझींनी आपल्या ताफ्यात घेतले.'' 

''डगआऊटमध्ये बसून राहणे आव्हानात्मक आहे, परंतु संघासाठी या भूमिकेचाही मी आनंद लुटत आहे. आमची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे आणि माझ्या संधीची मी वाट पाहत आहे. भारतातील युवा खेळाडूंविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, आता खेळपट्टी फिरकीला मदत करत आहे,'' असे ताहीर म्हणाला.  

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्स