Join us  

IPL 2020 MI vs SRH: सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचे पारडे जड

IPL 2020 MI vs SRH: सनरायजर्सचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी असल्याने त्याचे खेळणे शंकास्पद आहे. शारजाच्या लहान मैदानावर मोठे फटके मारण्याचे मुंबईचे प्रयत्न असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 5:58 AM

Open in App

शारजा : स्फोटक फलंदाजी क्रम आणि डेथ ओव्हरमध्ये शानदार मारा करणाऱ्या गोलंदाजांचा भरणा असलेला मुंबई इंडियन्स संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमध्ये आज रविवारी होणाºया लढतीत भक्कम मानला जात आहे.सनरायजर्सचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी असल्याने त्याचे खेळणे शंकास्पद आहे. शारजाच्या लहान मैदानावर मोठे फटके मारण्याचे मुंबईचे प्रयत्न असतील. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाजांना फिरकीपटू राहुल चाहर आणि कृणाल पांड्या यांची चांगली साथ मिळत आहे.सनरायजर्स संघाने युवा खेळाडूंच्या देदीप्यमान कामगिरीच्या बळावर विजयाची चव चाखली शिवाय सिनिअर्सवरील दडपण काही अंशी कमी केले आहे. युवा अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग आणि अब्दुल समद हे विजय साकार करु शकतात हे सीएसकेविरुद्ध सिद्ध झाले आहे.वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. आर्द्रता असल्याने प्रचंड उकाडा राहील. २३ किमी प्रतिताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.पीच रिपोर्ट । पाटा खेळपट्टी असल्याने साधारणपणे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता. फलंदाजांवर आवर घालण्यासाठी येथे गोलंदाजांना मोठी कसरत करावी लागते.मजबूत बाजूमुंबई । कप्तान रोहित शर्माचा शानदार फॉर्म. डेथ ओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी. ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड हे मोठे फटके मारण्यात तरबेज.हैदराबाद । सीएसकेवरील विजयाने मनोबल उंचावले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे हे वादळी फलंदाजी करण्यात सक्षम आहेत.कमजोर बाजूमुंबई । सलामीवीर क्विंंटन डिकॉक आऊट आॅफ फॉर्म आहे. सूर्यकुमार यादव चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.हैदराबाद । मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी. वेगवान टी. नटराजन खलील अहमद आणि स्टार स्पिनर राशिद खान यांच्यावर दडपण येत असल्याने स्वैर मारा होण्याची शक्यता.

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद