Join us  

IPL 2020 MI vs RR: मुंबईच्या विजयाची हॅट्ट्रिक; राजस्थानचा ५७ धावांनी पराभव

सूर्यकुमार, बुमराह ठरले विजयाचे शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:35 AM

Open in App

अबुधाबी : गतविजेत्या मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईने राजस्थानला नमविले. सूर्यकुमार यादवच्या शानदार नाबाद अर्धशतकानंतर जसप्रीत बुम२२२राहच्या भेदकतेपुढे राजस्थान संघ कोलमडला.प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४ बाद १९३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. राजस्थानचा डाव १८.१ षटकांत १३६ धावांत संपुष्टात आला. यंदा पहिल्यांदाच नव्या चेंडूने गोलंदाजी केलेल्या बुमराहने राजस्थानच्या फलंदाजीला खिंडार पाडत केवळ २० चेंडूंत ४ बळी घेतले. टेÑंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांनीही २ बळी घेतले. राजस्थानकडून जोस बटलरने ४४ चेंडूंत ७० धावा फटकावत विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र मोक्याच्यावेळी त्याला बाद करुन मुंबईने पुनरागमन केले.त्याआधी, रोहित शर्मा-क्विंटन डीकॉक यांनी आक्रमक सुरुवात केल्यानंतरही मुंबईची धावगती काहीशी मंदावली. मात्र सूर्यकुमारच्या नाबाद ७० धावांमुळे मुंबईने आव्हानात्मक मजल मारली. श्रेयस गोपाळने एकाच षटकात रोहित शर्मा आणि ईशान किशन यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करुन मुंबईच्या धावगतीला ब्रेक दिला.डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक ९ बळी घेत बुमराहने केली कागिसो रबाडाची बरोबरी.जसप्रीत बुमराहची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी.टर्निंग पॉइंटसूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिलीविनिंग स्ट्रॅटेजीफलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानानंतर बोल्ट व बुमराह यांनी भेदक मारा करीत वर्चस्वाची संधी दिली नाही.सामन्यातील रेकॉर्डसूर्यकुमारची याआधीची सर्वोत्तम खेळी ७२ धावांची होती. २०१८ साली राजस्थानविरुद्धच सूर्यकुमारने ही खेळी केली होती.आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक १० बळी पॉवर प्लेमध्ये गमावले. आरसीबी, सीएसके आणि राजस्थान यांनी प्रत्येकी ७ बळी पॉवर प्लेमध्ये गमावले आहेत.

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सजसप्रित बुमराह