Join us  

IPL 2020 MI VS CSK Preview : चेन्नई युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता, संघर्ष करत असलेल्या सुपरकिंग्सची लढत मुंबई इंडियन्ससोबत

या लढतीत चेन्नई संघ युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यंदाच्या मोसमात आमच्यासाठी सर्वकाही संपल्याची कबुली दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 5:52 AM

Open in App

शारजाह : चेन्नई सुपरकिंग्सला इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमात अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यांच्या कामगिरीचा आलेख सामन्यागणिक खालावत आहे. शुक्रवारी त्यांना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

या लढतीत चेन्नई संघ युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यंदाच्या मोसमात आमच्यासाठी सर्वकाही संपल्याची कबुली दिली आहे. पण संघाने उर्वरित चार सामने जिंकले तर संघाचे १४ गुण होतील आणि जर-तरच्या स्थितीत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्याची संधी राहील. स्पर्धेच्या सलामी लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळविणाऱ्या चेन्नई संघाची त्यानंतर कामगिरी ढेपाळत गेली. केदार जाधवला खेळविण्याच्या निर्णयावर टीका झाली. मजबूत बाजू -चेन्नई - युवा खेळाडूंना संधी दिली तर विजयाची शक्यता वाढेल.मुंबई - संघ शानदार फॉर्मात. गोलंदाजी आक्रमणामध्ये विविधता. क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांची शानदार कामगिरी. पोलार्ड व हार्दिक पांड्या आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम. लेग स्पिनर राहुल चाहलची भेदक गोलंदाजी.

कमजोर बाजू -चेन्नई - आता ड्वेन ब्राव्होची सेवा मिळणार नाही. फाफ ड्युप्लेसिसचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फॉर्मात नाही. संघामध्ये वेगाने धावा फटकावण्याच्या क्षमतेचा अभाव दिसत आहे.मुंबई - रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी. नाथन कुल्टर नाईट गेल्या लढतीत महागडा ठरला.

आमने सामनेसामने - 29विजय - मुंबई -  17चेन्नई - 12अनिर्णित - 0 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स