Join us  

IPL 2020 MI vs CSK Latest News:  मुंबई इंडियन्सच्या संघात दोन खेळाडूंचे पदार्पण, सौरभ तिवारीचे पुनरागमन

MI vs CSK Latest News & Live Score ; सौरभ तिवारीचे पुनरागमन

By स्वदेश घाणेकर | Published: September 19, 2020 7:18 PM

Open in App

IPL 2020 MI vs CSK Latest News: कोरोना व्हायरसच्या संकटात सर्व क्रिकेट चाहत्यांना सुखावणारा हा दिवस... Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज सुरूवात झाली. क्रिकेट चाहते अगदी चातकासारखे या प्रसंगाची वाट पाहत होते. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) या दोन तगड्या संघांमध्ये सलामीचा सामना अगदी थोड्यावेळात सुरू होईल. MI/CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, दोन्ही संघांची Playing XI ( अंतिम 11 खेळाडू) कोण असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आजच्या सामन्यासाठी MIनं तगडी फौज मैदानावर उतरवली आहे.

इतर पर्वाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स ( MI) जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. रोहित शर्मानं ( Rohit Sharma) सरावात टोलावलेला उत्तुंग षटकार चक्क मैदानाबाहेरून जाणाऱ्या बसच्या छतावर पडला होता. त्याच्या फटकेबाजीचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. मुंबई इंडियन्स हा IPLमधील सर्वात यशस्वी संघ आहे. MI ने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये IPLचे जेतेपद नावावर केले. UAEतही मुंबई इंडियन्सही फेव्हरिट मानले जात आहे. पण, UAEतील इतिहास मुंबई इंडियन्सच्या विरोधात आहे. मुंबई इंडियन्सनं येथे खेळलेल्या पाच सामन्यांत एकही विजय मिळवलेला नाही. पण, Past is Past असे रोहितनं सामन्यापूर्वी सांगितले होते. 

यापूर्वी 2014मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा यूएईत पार पडला होता. 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण आयपीएल भारताबाहेर होण्याची ही पहिली वेळ आहे. 2014मध्ये झालेल्या आयपीएलचे एकूण 20 सामने यूएईत झाले होते. मुंबई इंडियन्सना यूएईत झालेल्या पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.   

UAE तील अऩ्य संघांची कामगिरीकिंग्स इलेव्हन पंजाब - 5 सामने , 5 विजयचेन्नई सुपर किंग्स - 5 सामने, 4 विजय, 1 पराभवराजस्थान रॉयल्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभवकोलकाता नाईट रायडर्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभवरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 सामने, 2 विजय, 3 पराभवसनरायझर्स हैदराबाद - 5 सामने, 2 विजय, 3 पराभवदिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 सामने, 2 विजय, 3 पराभवमुंबई इंडियन्स - 5 सामने, 5 पराभव 

पास्ट विसरून वर्तमानात जगणारा MI...लसित मलिंगाची अनुपस्थिती ही MIसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते. पण, रोहित त्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फेरन्समध्ये त्यानं तो निर्धार बोलून दाखवला. मागील मोसमाप्रमाणे यंदाही रोहित सलामीला ( Opening) येणार आहे. त्याच्यासोबत क्विंटन डी'कॉक असेल, हे मुंबई इंडियन्सनं जाहीर केलं होते. त्यामुळे मुंबईची बॅटींग लाईनअप आधीच माहित होती. मुद्दा होता तो मलिंगाच्या रिप्लेसमेंटचा आणि त्याच्या जागी संघात जेम्स पॅटिन्सन याला संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सचे Playing XI ( MI XI vs CSK XI)क्विंटन डी'कॉक, किरॉन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल चहर, जसप्रीत बुमराह

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स