Join us  

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती

IPL 2020 MI vs CSK Latest News :काही तासांमध्येच आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या तुल्यबळ संघांमध्ये होत असून हा आयपीएलमधील ‘हायव्होटेज’ सामना मानला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:47 PM

Open in App

आजपासून सुरु होत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) च्या १३व्या हंगामासाठी सारे क्रिकेटविश्व सज्ज झाले आहे. तब्बल सहा महिन्यांनी भारतीय खेळाडू मैदानात उतरणार असल्याने क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. क्रिकेट आणि सट्टेबाजी यांचे नाते फार जुने आहे, त्यात आयपीएल म्हटले की सट्टेबाजांची दिवाळीच. यंदाच्या आयपीएलसाठीही सट्टेबाजांनी जय्यत तयारी केली असून यामुळे पोलिसांच्या कामगिरीतही वाढ होणार आहे. एकीकडे सट्टेबाजांनी आपल्या सर्व पंटर्सना तयार करुन सर्व सेटींग लागली असताना, दुसरीकडे पोलिसांनीही सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. . ( IPL 2020 Live Updates, Click here

 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद!

सहाजिकच सट्टेबाजांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यानुसार या दोन्ही संघांचा भाव किती आहे, याचीही माहिती मिळाली असून सट्टा बाजारात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अधिक पसंती मिळत आहे. त्याचवेळी, खेळाडूंमध्ये रोहित शर्माला अधिक पसंती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सचा ४.९० रुपयांचा रेट असून चेन्नई सुपरकिंग्जचा रेट ५ रुपये इतका आहे. म्हणजेच जर कोणी मुंबई संघावर १,००० रुपये लावले आणि मुंबईने बाजी मारली, तर त्या व्यक्तीला ४,९०० रुपये मिळतील. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात सर्वाधिक पसंती मुंबईला मिळत आहे.

हार्दिक पांड्या बनतोय कर्णधार!गेल्या काही वर्षांत फँटसी अ‍ॅपने क्रीडाप्रेमींमध्ये धुमाकुळ घातला आहे. कोणताही सामना सुरु होण्याआधी क्रीडाप्रेमींना ड्रीम ११, माय ११ सर्कल, एमपीएल अशा अनेक फँटसी अ‍ॅपवर आपला सर्वोत्तम संघ निवडता येतो. निवडलेल्या संघातील खेळाडूंच्या कामगिरीनुसार क्रीडप्रेमींना जास्तीत जास्त रोख रक्कम जिंकता येतात. यामध्ये कर्णधार असलेल्या खेळाडूच्या कामगिरीवर दुप्पट पॉइंट्स असल्याने चाहत्यांची कर्णधार म्हणून सर्वाधिक पसंती हार्दिक पांड्याला मिळत आहे. यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक असून अनेकांनी शेन वॉटसन आणि कृणाल पांड्या या अष्टपैलू खेळाडूंनाही कर्णधार म्हणून पसंती दिली आहे.

टॅग्स :आयपीएल 2020रोहित शर्मामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स