IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण!

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 10, 2020 11:55 PM2020-11-10T23:55:29+5:302020-11-11T00:05:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: KL Rahul and Kagiso Rabada Won Orange & Purple Cap respectively, Mumbai Indians won Fair Play Award  | IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण!

IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. मुंबईचे े पाचवे जेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावले होते. कर्णधार म्हणून पाच जेतेपद पटकावणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू आहे. या जेतेपदासह मुंबई इंडियन्सनं Fair Play Awardही जिंकला. किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यानं Orange Cap आणि दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) Purple Cap चा मान पटकावला.

लोकेश राहुलच्या KXIP संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आलं, परंतु त्याच्या फलंदाजीनं यंदाची आयपीएल गाजवली. लोकेशनं १४ सामन्यांत ५५.८३च्या सरासरीनं ६७० धावा केल्या. त्यात १ शतक व ५ अर्धशतकांचा समावेश होता. पंजाबला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये DCचा शिखर धवन ( ६१८), SRHचा डेव्हिड वॉर्नर ( ५४८), DCचा श्रेयस अय्यर ( ५१९) आणि MIचा इशान किशन ( ५१६) हे अव्वल पाचमध्ये राहिले.

गोलंदाजांमध्ये DCच्या कागिसो रबाडानं पर्पल कॅप जिंकली. त्यानं १७ सामन्यांत ३० विकेट्स घेतल्या. MIचा जसप्रीत बुमराह १५ सामन्यांत २७ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ अव्वल पाच जणांमध्ये ट्रेंट बोल्ट ( २५ विकेट्स), अॅनरिच नॉर्ट्झे ( २२) आणि युझवेंद्र चहल ( २१) यांचा क्रमांक लागला. Royal Challengers Bangaloreचा देवदत्त पडिक्कलने Emerging Player of the year हा पुरस्कार पटकावला. त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चर Most Valuable Player of the tournament ठरला. त्यानं १४ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या. 

 

Web Title: IPL 2020: KL Rahul and Kagiso Rabada Won Orange & Purple Cap respectively, Mumbai Indians won Fair Play Award 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.