इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) हा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. त्याच्या जुन्या ट्विट्सचा नेहमी वर्तमानकाळाशी संबंध जोडला जातो आणि त्यामुळे त्याला ज्योतिषाचार्य असेही म्हटले जाते. पण, रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघाविरुद्धच्या सामन्यात आर्चरच्या अशाच एका ट्विटची चर्चा रंगली. १८ सप्टेंबरला आर्चरनं Xbox UKयांना टॅग करून एक ट्विट केलं होतं. त्यात त्यानं त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि त्यावर Xbox UKकडून मजेशीर उत्तरही मिळालं. सोशल मीडियावरील या खेळात अखेरीस आर्चरनं बाजी मारली आणि त्याला ५० हजार किमतीच्या Xboxची लॉटरी लागली.
आर्चरनं १८ सप्टेंबरला ट्विट करून Xbox UKला विचारलं होतं की, नवीन Xboxसाठी मला IPL 2020मध्ये किती विकेट्स घ्याव्या लागतील? तेव्हा Xboxनं त्याला उत्तर देताना, फक्त एक विकेट आणि ती पण डेव्हिड वॉर्नरची! आज आर्चरनं SRHचा कर्णधार वॉर्नरचा त्रिफळा उडवला अन् आर्चरनं XboxUK यांना त्या ट्विटची आठवण करून दिली. Xbox UKने त्यांचा शब्द पाळून आर्चरकडे त्याचा पत्ता मागितला. आता त्याला ५० हजार किमतीच्या Xbox या नवीन गेमिंगची प्रतीक्षा आहे.
पाहा ट्विट...
राहुल टेवाटिया-रियान परागनं राजस्थान रॉयल्सला मिळवून दिला अशक्यप्राय विजयराजस्थान रॉयल्सनं रविवारी
सनरायझर्स हैदराबादवर अशक्यप्राय विजय मिळवला. SRHच्या ४ बाद १५८ धावांचा पाठलाग करताना RRचा निम्मा संघ ७८ धावांत माघारी परतला होता. पण, राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RRला शर्यतीत कायम राखले होते. अखेरच्या १८ चेंडूंत विजयासाठी ३६ धावांची गरज असताना टेवाटियानं रशीद खानच्या एका षटकात १४ धावा चोपल्या. नटराजननं टाकलेल्या १९व्या षटकातही १४ धावा चोपून ६ चेंडूंत ८ धावा असा सामना फिरवला. राहुलनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ४५ धावा केल्या, तर परागनं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह नाबाद ४२ धावा करून RRला पाच विकेट्सनं विजय मिळवून दिला.