Join us

IPL 2020: चार वर्षांनंतर जेसन होल्डरचे आयपीएलमध्ये पुनरागमन

अखेरचा सामना ज्या संघाच्या विरोधात होल्डर खेळला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 22:45 IST

Open in App

वेस्ट इंडिज्चा अष्टपैलु खेळाडू जेसन होल्डर याला आयपीएलच्या सामन्यात अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी तब्बल चार वर्षांनंतर मिळाली आहे.होल्डर याने आपला अखेरचा सामना कोलकाता नाईट रायडर्सकडून २५ मे रोजी खेळला होता. त्यानंतर तो आपला आयपीएलचा सामना आता अखेर २०२०च्या सत्रात खेळला.

अखेरचा सामना ज्या संघाच्या विरोधात होल्डर खेळला होता. त्याच संघाकडून म्हणजे सनरायजर्सकडून आज तो मैदानात उतरला होल्डर याने आपल्या अखेरच्या सामन्यात युवराज सिंग आणि नमन ओझाला बाद केले होते. त्याने ३३ धावा देत हे दोन बळी मिळवले होते. तर गुरूवारी रात्री झालेल्या या सामन्यातही त्याने ३३ धावा देत तीन बळी घेतले आहेत.

अष्टपैलु होल्डर याने आतापर्यंत आयपीएलचे १२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८ बळी देखील मिळवले आहेत. गेल्या काही काळापासून तो वेस्ट इंडिज्च्या संघाचा नियमीत सदस्य आहे.अखेरचा सामना २०१६केकेआर विरुद्ध सनरायजर्स २/३३२०२० चा सामनासनरायजर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ३/३३

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबाद