Join us

IPL 2020: ...म्हणून मी मैदानावर खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जातो; ताहीरच्या ट्विटनं जिंकली सगळ्यांची मनं

IPL 2020 CSK Imran Tahir: इम्रान ताहीरच्या ट्विटचं सोशल मीडियाकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 15:00 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहीर हा यंदाच्या सत्रात काही वेळा मैदानावर खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाताना दिसला आहे. त्याबाबत त्याने केलेल्या ट्विटचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या ट्विटमध्ये इम्रानने म्हटले की, जेव्हा मी मैदानात खेळत होतो. तेव्हा अनेक खेळाडू माझ्यासाठी ड्रिंक्स घेऊन येत असत.मात्र आता जे खेळाडू मैदानात खेळतात त्यांच्यासाठी ड्रिंक्स घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे. त्यांचे त्यावेळचे प्रेम मी परत करु शकतो. हे खेळण्याशी किंवा संघाच्या जिंकण्याशी संबधित नाही. जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच माझ्या संघाला सर्वोत्तम मिळवून देईल.’२०१९ च्या सत्रात ताहीर याने १७ सामन्यात २६ बळी घेतले होते. दक्षिण आफ्रिकन खेळाडू असलेल्या ताहीर याची टी २० तील कामगिरीही सरस राहिली आहे. मात्र त्याला अद्याप आयपीएलच्या या सत्रात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र त्यामुळे तो अजिबात निराश झालेला नाही. कारण त्याच्यासाठी संघ आणि संघ भावनाच महत्त्वाची असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्स