Join us

IPL 2020 : हरभजन सिंगनं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण; CSKबाबत म्हणाला...

चेन्नईच्या संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू असलेल्या भज्जीनं माघार घेतल्यानं धोनीची चिंता वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 16:58 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल)च्या 13व्या मोसमासाठी दुबईत दाखल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ससमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनापाठोपाठ अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यानंही वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची संख्या वाढल्यामुळे संघातील बऱ्याच खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळेच रैनानं माघार घेतल्याचीही चर्चा होती.   अखेर भज्जीनंही आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.  

"काय केलतं त्या पबजीनं?... इथे परिस्थिती काय?"; वैतागलेल्या PUBG वेड्या पोराचा व्हिडीओ व्हायरल

2018मध्ये भज्जी चेन्नई संघाचा सदस्य झाला. त्यानं 2018 व 2019 च्या मोसमात 24 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये एकूण त्यानं 160 सामन्यांत 150 विकेट्स घेतल्या आहेत. 

त्यानं ट्विट करून सांगितलं की,''वैयक्तिक कारणास्तव मी यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्यासाठी आव्हानात्मक काळ आहे आणि मी प्रायव्हेसीची अपेक्षा करत आहे. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापन खूप आधार देणारे आहेत आणि आयपीएलसाठी त्यांना शुभेच्छा... सुरक्षित राहा. जय हिंद.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

वाघिण मुंबईत येतेय, दम असेल तर अडवून दाखवा; बबिता फोगाटनं दिलं चॅलेंज 

चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स सलामीला भिडणार; BCCI लवकरच वेळापत्रक जाहीर करणार 

सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का

टॅग्स :हरभजन सिंगआयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्स