Join us

IPL 2020: आक्रमक खेळण्याच्या इराद्यानेच उतरलो होतो: श्रेयस

IPL 2020: श्रेयसचा कोलकात्याविरुद्ध ३८ चेंडूत नाबाद ८८ धावांचा झंझावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 04:12 IST

Open in App

शारजाह : केकेआरविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होतो. लहान मैदानावर फटकेबाजी करण्याची हीच ती वेळ होती, असे मत ३८ चेंडूत नाबाद ८८ धावांचा झंझावात करणारा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितले.सामनावीर ठरलेला अय्यर म्हणाला, ‘या मैदानावर कुठलीही धावसंख्या मोठी नसते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवणे सोपे नाही. येथे सामने रोमहर्षक होतात आणि काठावर निकाल लागतात. माझ्या खेळीबाबत बोलायचे तर लहान मैदानावर गोलंदाजांवर दडपण आणण्याची ही संधी होती. फलंदाजीवर मेहनत घेतल्यामुळे प्रतिभेचा वापर करूनफटके मारले.

टॅग्स :IPL 2020