शारजाह : केकेआरविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होतो. लहान मैदानावर फटकेबाजी करण्याची हीच ती वेळ होती, असे मत ३८ चेंडूत नाबाद ८८ धावांचा झंझावात करणारा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितले.
सामनावीर ठरलेला अय्यर म्हणाला, ‘या मैदानावर कुठलीही धावसंख्या मोठी नसते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवणे सोपे नाही. येथे सामने रोमहर्षक होतात आणि काठावर निकाल लागतात. माझ्या खेळीबाबत बोलायचे तर लहान मैदानावर गोलंदाजांवर दडपण आणण्याची ही संधी होती. फलंदाजीवर मेहनत घेतल्यामुळे प्रतिभेचा वापर करून
फटके मारले.