Join us  

IPL 2020: मुंबईच्या ‘या’ गोलंदाजामुळे फॉर्ममध्ये आला अडखळत खेळणारा विराट कोहली

IPL 2020 Virat Kohli: नेमका कधी गवसला हरवलेला सूर; खुद्द विराटनंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 4:03 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये सुरुवातीच्या सामन्यांत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अपयशी ठरल्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) संघाला प्रचंड दडपण आले होते. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सुपर ओव्हरपर्यंत रंगलेला सामाना आरसीबीसाठी निर्णायक ठरला. कारण याच सामन्यापासून कोहली फॉर्ममध्ये आला आणि आपला फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) कारणीभूत ठरला असल्याचेही खुद्द कोहलीने सांगितले.शनिवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार कामगिरी करताना कोहलीने ९० धावांची जबरदस्त खेळी केली. त्याआधी कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७२, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४३ धावांची खेळी केली होती. परंतु, स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत कोहली अपयशी ठरला होता. आता कोहलीने आपल्या फॉर्ममध्ये येण्याचे रहस्य सांगितले असून त्याने याचे श्रेय बुमराहच्या गोलंदाजीला दिले.चेन्नईविरुद्ध मिळवलेल्या शानदार विजयानंतर कोहलीने सांगितले की, ‘मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहविरुद्ध मारलेला पूल शॉटने माझा विचार बदलला. मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी मी खूप काही करण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:वर दडपण ओढवून घ्यायचो. दबावामध्ये आल्यानंतर तुम्ही एका खेळाडूप्रमाणे नाही खेळत. बुमराहविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये मला प्रत्येक चेंडूवर फटका मारणे अनिवार्य होते. नाहीतर आमचा पराभव झाला असता. येथूनच माझा विचार बदलला आणि त्यानंतर मी माझा सराव आणि फलंदाजीचा आनंद घेऊ लागलो.’यंदाच्या सत्रातील पहिल्या सत्रात कोहलीने १४, १ आणि ३ अशा धावांची खेळी केली आहे. मात्र यानंतरच्या तीन डावांमध्ये त्याने ७२*, ४३ आणि ९०* अशा खेळी केल्या आहेत. आतापर्यंत कोहलीने ६ सामन्यांतून ५५.७५ च्या सरासरीने २२३ धावा काढल्या आहेत.  

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीजसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर