Join us  

IPL 2020 Fixed? मुंबई इंडियन्सच्या वादग्रस्त ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण

या सामन्यात मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 12, 2020 4:40 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) मात करून गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली. पण, या सामन्यात मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. MI विरुद्ध DC हा सामना रविवारी अबु धाबी येथील शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या शिखर धवन ( ६९) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( ४२) यांनी खिंड लढवताना दिल्लीला २० षटकांत ४ बाद १६२ धावांचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ५) लगेच माघारी परतला तरी क्विंटन डी'कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. आर अश्विननं ही भागीदारी तोडली. क्विंटन ३६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. यादवने ३२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावा केल्या.  इशान किशनने १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांची खेळी केली. त्यांच्यामुळे मुंबईने ५ विकेट्स राखून सामना जिंकला.

सर्व संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगील झालेली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व फ्रँचायझी त्यांच्या टीमची सर्व अपडेट्स चाहत्याना देतात.  पण, रविवारी मुंबई इंडियन्सनं केलेलं एक ट्विट वादात अडकले आहे. त्यामुळे फिक्सिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्ली विरुद्धच्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं एक ट्विट केलं. त्यात त्यांनी दिल्लीचा संघ किती धावा करेल हे जाहीर केलं आणि त्यांनी व्यक्त केलेला अंदाज काहीअंशी खरा ठरला. मुंबई इंडियन्सनं दिल्ली ५ बाद १६३ धावा करेल, असे म्हटले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिल्लीनं ४ बाद १६२ धावा केल्या.  

हे ट्विट आता डिलीट झाले आहे. पण, चाहत्यांनी लगेच त्याचे स्क्रीनशॉट घेतले आणि फिक्सिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  या प्रकरणावर IPL गव्हर्निंग काऊंसिल आणि बीसीसीआयकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.  

टॅग्स :IPL 2020मॅच फिक्सिंगमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स