IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद, दिल्लीवर 5 विकेट्स राखून विजय

आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला. 

By स्वदेश घाणेकर | Published: November 10, 2020 06:24 PM2020-11-10T18:24:24+5:302020-11-10T22:55:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Final MI vs DC Live Score Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2020 Final Live Score and Match updates | IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद, दिल्लीवर 5 विकेट्स राखून विजय

IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद, दिल्लीवर 5 विकेट्स राखून विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या MIनं दुबईत झालेल्या IPL2020च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले.

IPL 2020 Final MI vs DC Live Score

रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विजयासाठीच्या आवश्यक धावा अन्य फलंदाजांनी सहज केल्या. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईनं १८.४ षटकांत ५ बाद १५७ धावा करून जेतेपद पक्कं केलं. इशान किशन १९ चेंडूंत ३३ धावांवर नाबाज राहिला. 
 

रोहितनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलच्या अंतिम सामन्यात दोन अर्धशतकी खेळी करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. यापूर्वी त्यानं २०१५च्या फायनलमध्ये ५० धावा केल्या होत्या. रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. 

मुंबईनं १० षटकांत १ बाद ८८ धावा केल्या आणि त्यांना अखेरच्या १० षटकांत विजयासाठी ६० चेंडूंत ६९ धावा हव्या होत्या. पण, ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित व सूर्यकुमार यादव यांच्यात ताळमेळ चूकला अन् रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यानं स्वतःला रन आऊट करून घेतले. रोहितला त्याचे दुःख नक्की वाटले. रोहितनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 

समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी'कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसनं पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( २०) बाद केले. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी मुंबईनं २०१५च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १ बाद ६१ धावा केल्या होत्या. 
 

रिषभनं ३५ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. नॅथन कोल्टर नायलच्या सलग दोन चेंडूवर चौकार मारणारा रिषभ १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. रिषभच्या विकेटनं श्रेयस अय्यरसोबतची त्याची ९६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. श्रेयसनंही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना दिल्लीचा डाव सावरला. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत 7 बाद १५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या.

रिषभनं ३५ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. नॅथन कोल्टर नायलच्या सलग दोन चेंडूवर चौकार मारणारा रिषभ १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. रिषभच्या विकेटनं श्रेयस अय्यरसोबतची त्याची ९६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 
 

ट्रेंट बोल्टनं पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स घेत मिचेल जॉन्सनच्या २०१३च्या विक्रमाशी बरोबरी केली. पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १६ विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. शिवाय आयपीएलच्या फायनलमध्ये प्रथमच पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रसंग घडला. फायनलमध्ये अंतिम ११मध्ये स्थान मिळवलेल्या जयंत यादवला ( Jayant Yadav) चौथे षटक दिले आणि त्यानं त्या षटकात शिखर धवनला ( १५) बाद केले. 
 

OMG; जोफ्रा आर्चरला सर्वच माहित्येय, जयंत यादवनं विकेट घेताच जूनं ट्विट व्हायरल

दिल्लीच्या संघाला रोखण्यासाठी MIकर्णधार रोहित शर्मानं संघात बदल करून मोठा डाव खेळला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये १५ विकेट्स घेणाऱ्या राहुल चहरला बाहेर बसवून जयंत यादवला अंतिम ११मध्ये स्थान दिले. दिल्लीच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्यानं हा बदल केल्याचे रोहितनं सांगितलं. मार्कस स्टॉयनिस व शिखर धवन हे सलामीला आले आणि ट्रेंट बोल्टनं पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला यष्टिरक्षक क्विंटन डी'कॉकला माघारी पाठवून दिल्लीला मोठा धक्का दिला. ट्रेंट बोल्टनं DCला आणखी एक धक्का देताना अजिंक्य रहाणेला ( २) बाद केले. 
 

IPL 2020 Final MI vs DC: रोहित शर्माची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी; आतापर्यंत या दोघांनाच जमला हा पराक्रम!

- राहुल चहर OUT, जयंत यादव IN
Mumbai Indians XI : क्विंटन डी'कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या,  जयंत यादव, नॅथन कोल्टर-नायल, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

Delhi Capitals XI: शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायर, रिषभ पंत, अक्षर पटेल, प्रविण दुबे, कागिसो रबाडा, आर अश्विन, अॅनरिच नॉर्ट्झे

मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेत्याचा होणार १० कोटींचा तोटा; जाणून घ्या कसा!

दुबईतील स्टेडियमवर संघांची कामगिरी
मुंबई इंडियन्स - ७ सामने, २ विजय, ५ पराभव
दिल्ली कॅपिटल्स - १० सामने, ५ विजय, ५ पराभ
 
Head to head overall:
एकूण सामने २७, मुंबई ईंडियन्स १५ विजयी, दिल्ली कॅपिटल्स १२ विजय

आज कोणते विक्रम मोडणार 
- मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला ८ धावा कराव्या लागतील, तर ४३ धावा करताच कर्णधार म्हणून ३००० धावा तो पूर्ण करेल.
- आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करण्यासाठी किरॉन पोलार्डला २ उत्तुंग फटके मारावे लागतील
- दिल्ली कॅपिटल्सकडून १५०० धावा पूर्ण करण्यासाठी शिखर धवनला ३६ धावांची गरज आहे
- आयपीएल २०२०त ५०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी श्रेयस अय्यरला ४६ धावा कराव्या लागतील
 

Web Title: IPL 2020 Final MI vs DC Live Score Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2020 Final Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.